आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️रेगुंट गावातील वार्ड क्र. १ मध्ये पाणी, नाली व रस्त्यांच्या समस्यांनी नागरिक त्रस्त..

 

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ: उज्वल देवनाथ

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील विटलरावपेटा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रेगुंट गावातील वार्ड क्रमांक १ मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई, नाल्यांची दुरवस्था आणि खराब रस्त्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल साचत असून नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नाल्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने सांडपाणी साचून दुर्गंधी पसरत असून आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा होत नसल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

रेगुंट गावातील वार्ड क्रमांक १ मधील या मूलभूत समस्या तातडीने सोडवून पाणीपुरवठा, नाल्यांची दुरुस्ती व स्वच्छता तसेच रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी विटलरावपेटा ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.