▪️मनपा दालणात दलितांना न्याय मिळणार का? दलितांच्या जागेवर मनपाचा आखाडा कब्जा..
▪️पिडीताची थेट मुख्यमंत्री व NCSC कडे दाद..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संगनमताने अनु.जातीच्या व्यक्तीच्या मालकीच्या जागेचे बेकायदेशीररित्या कर आकारणी पत्रक तयार करुन मालकी हक्क बदलण्यासह अवैध कब्जा करून जागा हडप करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.त्यामुळे धनदांडग्यांकडून अनुसूचित जातीच्या कुटुंबावर उघड अन्याय झाल्यामुळे दोषींवर अँट्रासीटी अँक्टनुसार कारवाई करून पिडीत कुटुंबाला न्याय देण्याची मागणी दलित पँथरने केली आहे.
चंद्रपूर शहरातील नगिनाबाग येथील रहिवासी मुन्ना तावाडे यांच्या मालकीची महात्मा गांधी चौकाजवळील एकोरी वार्डातील, न.भू.क्र. 6679 ही खाजगी जागा आहे. या जागेवर मनपाच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने बनावट मालमत्ता कर आकारणीचा तक्तापत्रक तयार करून बेकायदेशीर कब्जा केला आहे.
▪️35 पत्रे, 0 कार्यवाही!
या अन्यायाविरुद्ध तावाडे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून लढा दिला आहे. मुख्यमंत्री सचिवालय कार्यालय, जिल्हाधिकारी चंद्रपूर, पोलीस अधिक्षक,पोलीस निरीक्षक, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार, दलित पँथर जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार यांनी मुन्ना तावाडे यांच्या माध्यमातून एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे मनपा आयुक्त यांना एकूण *35 पत्रे* देऊनही प्रशासनाने अद्याप लेखी कार्यवाही केलेली नाही.
*कायदा काय म्हणतो..?*
मुन्ना तावाडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा प्रकार केवळ फसवणूक नसून *भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 316(2), 318(4), 61(2)* आणि *अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 चे कलम 3(1)(f), 3(1)(g) व कलम 4* अंतर्गत थेट गुन्हा आहे.
*▪️7 दिवसांचा अल्टिमेटम*
पीडित तावाडे यांनी प्रशासनाला 3 ठोस मागण्या केल्या आहेत:
1. *35 पत्रांवर झालेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल 7 दिवसात* देण्यात यावा.
2. *दोषींवर तात्काळ FIR आणि निलंबनाची कारवाई* करण्यात यावी.
3. *बनावट मालमत्ता विवरण व करआकारणी तक्ता रद्द करून ताबडतोब जागेचा ताबा* परत देण्यात यावा.
7 दिवसात न्याय न मिळाल्यास लोकायुक्त, मुख्यमंत्री, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, दिल्ली आणि उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथे जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
हा केवळ एका व्यक्तीचा प्रश्न नाही, तर *प्रशासनाच्या मनमानी आणि SC/ST कायद्याचा भंग* करण्याचा प्रश्न आहे.
▪️पालकमंत्री जबाबदारीतून गायब
जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके यांना गेल्या अनेक दिवसापासून दलित कार्यकर्त्यावर अन्याय होत असतांना अनेक वृत्तपत्रातू माहिती मिळाली पण पालकमंत्री महोदय अजूनपर्यंत नियोजन समितीच्या माध्यमातून दखल घेतलेली नाही. पालकमंत्री अनुसुचीत जमातीचे आहेत पण यांना जाती जमातीवरील अन्याय दिसत नाही का? असा थेट सवाल नागरिक करित आहे.
▪️सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली दखल
चंद्रपूर शहरात सध्या गाजत असलेल्या भुखंड घोटाळ्या प्रकरर्णी जागरूक नेता मुनगंटीवार यांनी दखखल घेऊन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांना पत्र देऊन दलित कार्यकर्त्याला न्याय मिळावा म्हणून पत्रव्यवहार केला मात्र अजूनही तावाडे यांना न्याय मिळाला नाही.
दलित संघटना एकवटल्या
मनपा प्रशासना विरोधात मनपाच्या व पालकमंत्री तथा स्थानिक आमदार यांच्या विरोधात जिल्ह्यातील भिम आर्मी चे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र डोहणे या़नी व पँथर संघटनेनी न्याय न मिळाल्यास आयुक्तांच्या केबीनवर हल्ला बोल आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. बाबासाहेब आबेडकरांनी आंदोलनातून महाड सत्याग्रह जिंकला, राम मंदिर प्रवेश आंदोलन जिकंले, आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत काय रोकायचे ते रोका पण आयुक्त यांच्या केबीनला घेराव करुन कामकाज बंद पाडू असा इशारा आंबेडकरी संघटनेनी दिला आहे.



