आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️गणपत सत्रे यांचा “स्वच्छता दूत” सन्मानाने गौरव..

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : रंजन सामाजिक मंच चंद्रपूर तर्फे सामाजिक कार्यकर्ते व स्वच्छता संबंधी कार्यात हिरवीने भाग घेणारे दररोज सकाळी दोन तास ग्रामसफाई राबविणारे श्री गणपत सत्रे यांना स्वच्छता दूत म्हणून गौरविण्यात आले.*”स्वच्छ गाव, सुंदर गाव, निरोगी जीवनाचा हाच ठाव” गणपतरावांनी स्वतःला स्वच्छता करण्याच्या कार्यात झोकून दिले आहे ते रोज न चुकता सकाळी दोन तास ग्रामसफाई करतात कोण काय म्हणतील याची चिंता न करता निरंतर स्वच्छता व ग्रामसफाई करतात व इतरांनाही स्वच्छते संदर्भात मार्गदर्शन करून प्रोत्साहित करतात.त्यांच्या कार्याचे अनुकरण करणारे अनेक कार्यकर्ते त्यांनी तयार केले आहे. त्यांच्या या कार्याचे परिसरात कौतुक होत असते त्यांच्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळालेली आहे ते पण या कार्यात सहभागी होताना नेहमीच दिसतात या गौरव सोहळ्यात रंजन सामाजिक मंच चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर, सचिव सचिन बरबटकर, सुदर्शन नैताम, नंदूजी घाटे, मनपा सभापती रवी लोणकर, रामजीवन परमार, मनीष दुबे, चंद्रकांत बोरीकर, ऍड नितीन घाटकीने, रमेश मंडाळे, अनंता त्रिनेकर, संजय काट्यारमल, अशोक पिंपळकर, रणजीत महाजन, राजेश सज्जनवार, राजू रामगिरवार, श्रीकांत सत्रे, प्रशांत बावणे, मंगेश बोकडे, विजय निवलकर, लोकेश हर्षे, राजेश तांबोळी, प्रकाश नांडा. या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.