आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️आसोला मेंढा नहराचे पाणी सोडुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.: राकेश गोलेपल्लीवार सदस्य ग्रा प जिबगांव यांची मागणी..

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

सावली – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यातील आसोला मेंढा परिसरातील शेतकरी सध्या पाण्याअभावी मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. खरीप हंगाम सुरू धान रोवणी थांबली असून पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे आसोला मेंढा नहराचे पाणी तात्काळ शेतीसाठी सोडण्यात यावे, अशी मागणी राकेश गोलेपल्लीवार सदस्य ग्रा प जिबगांव यांनी केली आहे.
राकेश गोलेपल्लीवार यांनी सांगितले की, परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली आहे. मात्र पुरेशा पाण्याअभावी पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नहराचे पाणी तातडीने सोडल्यास शेतकऱ्यांना रोवणी करण्यासाठी मोठा दिलासा मिळेल आणि पिकांचे नुकसान टाळता येईल.
तसेच प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन कोणताही विलंब न करता आसोला मेंढा नहराचे पाणी शेतीसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राकेश गोलेपल्लीवार सदस्य ग्रा प जिबगांव यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.