◼️ आवळगाव – मुडझा प्रभागातील क्षितिज महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिदेवाही: (इंडिया २४ न्युज )
ब्रह्मपुरी तालुका अभियान कक्ष, पंचायत समिती ब्रम्हपुरी अंतर्गत आवळगाव- मुडझा
प्रभागातील क्षितिज महिला प्रभाग संघ संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक ९ जुलै २०२६ रोजी आवळगाव ग्रामपंचायत सभागृहात उत्साहात पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभाग संघाच्या अध्यक्षा ज्योतीताई हुकरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच प्रीतमजी बाबनवाडे, उपसरपंच देविदासजी उकरे, पोलीस पाटील दामिनीताई बानबले, सचिव यामीनाताई भोयर, कोषाध्यक्ष गीताताई मेश्राम तसेच विविध ग्रामसंघाच्या अध्यक्षा, पदाधिकारी आणि ग्रामसखी उपस्थित होत्या.
प्रभाग समन्वयक ईश्वरजी मेश्राम यांनी सभेचे प्रास्तावित करून वार्षिक सर्वसाधारण सभेचे महत्त्व स्पष्ट केले. लिपिका रागीनीताई घोंगडे यांनी मागील वर्षाचा जमाखर्च व लेखाजोखा सादर केला. तालुका व्यवस्थापक अमोलजी मोडक यांनी उमेद अभियानाची माहिती दिली, तर समुदाय कृषी व्यवस्थापक प्रकाशजी अलोणे यांनी सेंद्रिय शेती विषयक विषयी मार्गदर्शन केले.
सभेच्या अध्यक्षीय भाषणात ज्योतीताई हुकरे यांनी महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी सर्वांना एकत्रपणे कार्य करण्याचे आवाहन केले. सभेचे सूत्रसंचालन निराशाताई गेडाम यांनी केले तर सुरेखाताई मेश्राम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
उपस्थित ग्रामसंघ पदाधिकारी, ग्रामसखी व सदस्यांच्या सहकार्यामुळे क्षितिज महिला प्रभाग संघ संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वीरित्या पार पडली.

