आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई..

▪️आंतरराज्यीय सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; ९ गुन्हे उघड, ४.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांनी दिले होते. या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखा (LCB) चंद्रपूर आणि बल्लारपूर पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई करत आंध्रप्रदेशातील एका सराईत आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्या अटकेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, रामनगर आणि चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेले घरफोडीचे ६ आणि मोटार सायकल चोरीचे ३ असे एकूण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत. दिनांक १९/०५/२०२६ रोजी बल्लारपूर येथील गोरक्षण वार्डात राहणाऱ्या फिर्यादी श्रीमती रजिता परमेश्वर सिंघाराव (वय ३९ वर्षे) या घर लॉक करून कामावर गेल्या असताना अज्ञात इसमाने त्यांचे घर फोडून ₹२,८७,०००/- किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि ₹५,०००/- रोख रक्कम असा एकूण १२,९२,०००/- चा मुद्देमाल चोरी केला होता (बल्लारपूर पो.स्टे. गुन्हा रजि. नं. ६०६/२०२६). सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी एक विशेष पथक तयार केले. पथकाने घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास चक्र फिरवले. तपासादरम्यान आरोपी हा राजमुंद्री (आंध्रप्रदेश) येथे असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी तिथे जाऊन त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. या कारवाईत तेलंगणाचे पोलीस अंमलदार नरेश दत्त यांनी आरोपीची ओळख पटवण्यात महत्त्वाची मदत केली. आरोपीचे नाव चिन्नाबाबु व्यंकटेशवरलु गोरेला (वय ३२ वर्षे, व्यवसायः शिक्षण) रा. २१-७-१९/बी, ३ री गल्ली कोरलामा पेट्टा, देवी चौक, राजमहेंद्रवरम (राजमुंद्री) शहर, ईस्ट गोदावरी, राज्य- आंध्रप्रदेश. अटक तारीख: ०८/०७/२०२६ गुन्हेगारी पार्श्वभूमीः आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी आंध प्रदेशात ४१ गुन्हे आणि तेलंगणा राज्यात ६ गुन्हे असे एकूण ४७ घरफोडी व चोरीचे गुन्हे नोंद आहेत. आरोपीची चोरी करण्याची पद्धत (Modus Operandi)
आरोपी हा आंध्रप्रदेशातून रेल्वेने विनातिकीट प्रवास करून चंद्रपूर जिल्ह्यात येत असे. स्वतःची ओळख लपवण्यासाठी तो नेहमी कॅप (टोपी), तोंडाला मास्क आणि पाठीवर कॉलेज बॅग बाळगत असे. रेल्वे स्टेशन परिसरातून तो आधी एखादी मोटार सायकल चोरी करायचा आणि त्याच चोरीच्या मोटार सायकलचा वापर करून आजूबाजूच्या परिसरात बंद घरे शोधून तिथे घरफोडी करायचा.
चोरी केल्यानंतर ती मोटार सायकल पुन्हा रेल्वे स्टेशन परिसरात सोडून देऊन रेल्वेने आपल्या मूळ गावी पसार व्हायचा. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
अंदाजे किंमत (रु.) हिरो होंडा पॅशन प्रो मोटार सायकल (MH 34 BM 5130), १४०,०००/-, हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल (MH 34 BE 9959), ₹३०,०००/-, डेस्टीनी कंपनीची मोपेड स्कूटर (MH 34 CC 3275), ₹५०,०००/-, सोन्याचे दागिने (राजमुंद्री येथील गोल्ड कंपनीतून हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू, ₹३,२०,०००/- , चांदीचे दागिने ₹२५,०००/-, एकूण मुद्देमाल किंमतः १४,६५,०००/- उघडकीस आलेले गुन्हे पोलीस ठाणे बल्लारपूरः गु.र.नं. ६०६/२०२६, ६०८/२०२६, ७५१/२०२६, पोलीस ठाणे राजुराः गु.र.नं. ४२७/२०२६, ४५०/२०२६, ४८९/२०२६, ५७६/२०२६, पोलीस ठाणे चंद्रपूर शहरः गु.र.नं. ३३९/२०२५, पोलीस ठाणे रामनगरः गु.र.नं. १०२८/२०२५
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे (प्रभारी, स्था.गु.शा. चंद्रपूर), बिपीन इंगळे (ठाणेदार, पो.स्टे. बल्लारपूर), सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कांकेडवार, बलराम झाडोकार (सायबर सेल), पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे तसेच अंमलदार स्वामीदास चालेकर, किशोर वैरागडे, अजय बागेसर, शरद कुडे, गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, वृषभ बारसिंगे (सर्व एलसीबी चंद्रपूर) आणि विकास जुमनाके, वैभव गाडगे (पो.स्टे. बल्लारपूर) यांनी बजावली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.