आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️नैराट येथील युवकावर रानडुकराचा प्राणघातक हल्ला; युवक गंभीर जखमी..

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

अकोला – ( इंडिया 24 न्युज ) : अकोला जिल्ह्यातील नैराट येथे एका युवकावर रानडुकराने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवार, दि. १० जुलै रोजी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण विष्णू नृपनारायण हे आपल्या शेतात काम करीत असताना अचानक एका रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी खोल जखमा झाल्या आहेत. हल्ल्याची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांची सुटका केली. त्यानंतर त्यांना तातडीने अकोला येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.
अलीकडील काळात रानडुकरे, नीलगाय व इतर वन्यप्राण्यांकडून शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवस-रात्र शेतात राहून पिकांची राखण करावी लागत आहे. अशा वेळी वन्यप्राण्यांचा सामना झाल्यास शेतकऱ्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होत असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर नैराट परिसरातील शेतकऱ्यांकन साठी वन विभागाने तातडीने उपाययोजना करून रानडुकरांचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक पावले उचलावीत तसेच जखमी शेतकऱ्याला शासकीय मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी निर्भय बनो जन आंदोलन तथा राष्ट्रीय लोक आंदोलनाच्या वतीने समाजसेवक गजानन हरणे यांनी केली आहे . अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.