आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️CCMP–BHMS नोंदणीविरोधी आंदोलनाला चंद्रपूर जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद; सर्व खासगी दवाखाने राहिले बंद..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. ४ ऑगस्ट २०२६ : इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) चंद्रपूर शाखेच्या नेतृत्वाखाली CCMP पात्रता असलेल्या BHMS डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) मध्ये नोंदणी करून आधुनिक वैद्यक (Modern Medicine) करण्यास परवानगी देण्याच्या प्रस्तावाविरोधात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला चंद्रपूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राकडून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. आंदोलनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व खासगी दवाखाने बंद ठेवून डॉक्टरांनी आपल्या भूमिकेचा ठाम व एकमुखी निषेध नोंदविला.

या आंदोलनामागील प्रमुख उद्देश रुग्णांची सुरक्षितता, आधुनिक वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता आणि पुराव्यावर आधारित (Evidence-based) वैद्यकीय सेवेचे मानदंड कायम राखणे हा आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने स्पष्ट केले की, एक वर्षाच्या CCMP अभ्यासक्रमाची तुलना MBBS पदवीच्या सर्वसमावेशक वैद्यकीय शिक्षण व क्लिनिकल प्रशिक्षणाशी होऊ शकत नाही.

IMA चंद्रपूर शाखेने शासनाकडे मागणी केली आहे की, हा विषय सध्या मा. मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्यामुळे अंतिम न्यायालयीन निर्णय होईपर्यंत CCMP पात्रता असलेल्या BHMS डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित ठेवावी. तसेच रुग्णहित, वैद्यकीय व्यवसायाची विश्वासार्हता आणि आधुनिक वैद्यकीय शिक्षणाचे उच्च मानदंड अबाधित राखण्यासाठी शासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी.

चंद्रपूर जिल्ह्यातील डॉक्टरांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून वैद्यकीय क्षेत्राच्या एकजुटीचे दर्शन घडविले. रुग्णांच्या सुरक्षिततेशी तडजोड होऊ नये आणि वैद्यकीय व्यवसायातील गुणवत्ता अबाधित राहावी, या व्यापक जनहिताच्या उद्देशाने हे आंदोलन करण्यात आल्याचे IMA चंद्रपूर शाखेने स्पष्ट केले.

यावेळी डॉ. मंगेश गुलवाडे, उपाध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य, 2013-14
डॉक्टर संजय घाटे डॉ. प्रसाद पोटदुखे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर शाखा आणि डॉ. ऋजुता मुंदडा, सचिव, इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर शाखा
डॉ नगीना नायडू यांनी सर्व डॉक्टर, वैद्यकीय संस्था आणि नागरिकांचे सहकार्याबद्दल आभार मानले तसेच रुग्णहितासाठी IMA पुढेही ठामपणे कार्यरत राहील, असा विश्वास व्यक्त केला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.