▪️विजयनगर स्वस्त धान्य दुकानदारावर कारवाई नाहीच – अधिकारी गप्प का? मॅडमच्या नावाने पैसे उकळून शिक्का मारल्या प्रकरणी प्रशासन गप्प..
▪️अंतोदय राशन कार्ड धारकांना फसवल्या प्रकरणे राशन कार्ड धारक आक्रोश..

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ – उज्वल देवनाथ
मूलचेरा, जि. गडचिरोली : मौजा विजयनगर (पो. कालीनगर) येथील स्वस्त धान्य दुकानदार संजित गणेश मंडल याने अंत्योदय रेशन कार्डच्या नावाने पुरवठा विभागाच्या मॅडमचे नाव सांगून गावकऱ्यांकडून पैसे घेतले आणि रेशन कार्डवर शिक्का मारला होता. या प्रकरणाची पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन दुरुस्ती केली असली तरी त्या धान्य दुकानदारावर आजतागायत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ग्रामस्थांनी या भ्रष्टाचाराबाबत मुख्यमंत्री तथा पालकमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब मूलचेरा, उपविभागीय अधिकारी चामोर्शी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.
त्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली (पुरवठा शाखा) यांनी दि. 28 जुलै 2026 रोजी आदेश क्र. 402 काढून तीन अधिकाऱ्यांना 15 दिवसात चौकशी करण्याचे आदेश दिले. पण आदेश येऊन महिने झाले तरी संबंधित स्वस्त धान्य दुकानदारावर कोणतीही कारवाई झाली नाही, तो तसाच दुकान चालवत आहे.
यामुळे विजयनगरच्या सर्व गावकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून प्रशासनाने तात्काळ या दुकानदाराचा परवाना रद्द करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
तक्रारदार – विजयनगर सर्व गावमंडळी : सौ. इंद्रा रतन बसू, सौ. रीना समीर बसू, सौ. लक्ष्मी तनुप बसू, सौ. राखी संदीप राय, सौ. कनिका प्रभाष राय, श्री. गणेश विष्णू बाइड, श्री. तनुप तारापद बसू, श्री. समीर नीलरतन बसू, श्री. रतन श्रीपद बसू, सौ. अनिमा सपन बिस्वास, सौ. बनिता संजित बसु (ग्रा.पं. सदस्या).
प्रतिक्रिया : मुख्य संपादक यांच्यासोबत झालेली चर्चेच्या माध्यमातून प्रतिक्रिया- माझ्या कार्यकाळात हे प्रकरण घडलेले नाही आणि मी त्यांना बोलावले आणि सांगितले ही दुय्यम प्रत असल्याने यावर गलतीने हे सिक्के मारलेले आहे अशा प्रकारे इंगोले मॅडम यांनी प्रतिक्रिया दिली. स्वस्त धान्य दुकानदार यांनी ऑनलाइन पद्धतीने मी स्वस्त धान्य वाटण्याचे कारण करीत आहे. असे सांगितले मी कोणत्याही प्रकारे पैशाचा व्यवहार केलेला नाही असे त्यांनी प्रतिक्रिया दिली.



