आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️विसापूर येथे 3 ते 16 ऑक्टोबरदरम्यान अग्निवीर भरती रॅली..

▪️ऑनलाइन प्रवेश परीक्षेत यशस्वी उमेदवारांनी प्रवेशपत्रावरील वेळापत्रकानुसार उपस्थित राहण्याचे आवाहन..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं.7030292628*

चंद्रपूर, दि. 17 : सेना भरती कार्यालय, नागपूर यांच्या वतीने भारतीय सैन्याच्या अग्निवीर भरतीसाठी दि. 3 ते 16 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विसापूर येथील तालुका क्रीडा संकुलात भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षेत (सीईई) यशस्वी झालेल्या पात्र उमेदवारांना या रॅलीमध्ये सहभागी होता येणार आहे.

या भरती रॅलीमध्ये अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांतील पात्र उमेदवार सहभागी होणार आहेत. अग्निवीर जनरल ड्युटी (ऑल आर्म्स), अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल (ऑल आर्म्स), अग्निवीर ट्रेड्समन दहावी उत्तीर्ण (ऑल आर्म्स) आणि अग्निवीर ट्रेड्समन आठवी उत्तीर्ण (ऑल आर्म्स) या प्रवर्गांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

अग्निवीर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल (ऑल आर्म्स) या प्रवर्गासाठी संबंधित भरती विभागाच्या कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र, गुजरात व गोवा राज्ये तसेच दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव येथील सर्व जिल्ह्यांतील पात्र उमेदवारांची भरती रॅलीदेखील याच ठिकाणी होणार आहे.

ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षेत यशस्वी उमेदवारांनी भारतीय सैन्याच्या अधिकृत संकेतस्थळावर आपल्या लॉग-इन तपशिलांचा वापर करून भरती रॅलीचे प्रवेशपत्र डाउनलोड करावे. प्रत्येक उमेदवाराच्या प्रवेशपत्रावर उपस्थित राहण्याची तारीख, वेळ आणि ठिकाण नमूद असेल. उमेदवारांनी प्रवेशपत्रावरील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून निर्धारित तारीख व वेळेनुसार सर्व मूळ कागदपत्रांसह भरतीस्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन सेना भरती कार्यालय, नागपूर यांनी केले आहे.

अधिक माहिती अथवा शंका निरसनासाठी उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत सेना भरती कार्यालय, नागपूर यांच्या 0712-2958867 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.