▪️आंतरराज्यीय आरोपीसह ०३ पुरूष आरोपीकडुन १७.४७५ किलो गांजा जप्त.
▪️चारचाकी वाहन व ०४ मो. एकुण १७,०८,७५०/- रू मालमुद्दा जप्त.. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरची कार्यवाही..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं.7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. ०२/०९/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार यांना गुप्तबातमीदाराकडुन माहिती मिळाली की, काही इसम हे ओरीसा येथुन गांजा घेवुन चारचाकी वाहनाने येणार आहे सदर गांजा विक्रीकरीता घेवुन जाणार आहेत, अशा माहितीवरून बल्लारपुर राजुरा मार्गावर बामणी चौक येथे सापळा रचुन आरोपी नामे अमोल रमेश कांबळे, वय ३३ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. एरंडी सरोडा, ता. औसा जि. लातुर. २) सदानंद रविंद्र जना, वय ३२ वर्षे, व्यवसाय मजुरी रा. साबोरीया, ता. खलीगोट जि. गंनजम राज्य ओडीसा ३) ओंगा बिरा कोवासी, वय २८ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. बोपनपल्ली ता. कालीमेला, जि. मलकनगिरी राज्य ओडीशा यांचेसह चारचाकी क्रमांक एमएच-२४ बीआर-९२८२ पकडला असता त्यांचेकडे १७.४७५ किलो गांजा अवैध वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने आरोपीकडुन वापरते मोबाईल -४, गांजा सदृश्य वनस्पती १७.४७५ किलो व चारचाकी वाहन असा एकुण १७,०८,७५०/- रू चा माल जप्त करण्यात आला आहे. करीता आरोपीविरूध्द गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अन्वये पोलीस स्टेशन बल्लारशा येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीतांना अटक करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस स्टेशन बल्लारशा करीत आहे.
सदरची कार्यवाही मा.श्री. आयुष नोपानी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा.श्री. ईश्वर कातकडे अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्री. अमोल काचोरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यांचे नेतुत्वात सपोनि दिपक कांकेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि सर्वेश बेलसरे, सफौ स्वामीदास चालेकर, पोहवा अजय बागेसर, पोहवा गणेश भोयर, पोहवा रामराव बिंगेवाड, पोहवा शरद कुडे, पोहवा रजनींकांत पुठ्ठावार, पोहवा सचिन गुरनुले, पोहवा सुभाष गोहोकार, पोअं प्रतिक हेमके, पोअं विठ्ठल काकडे, पोअं/ प्रफुल पुप्पलवार पोशी/दिनेश अराडे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.



