आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️भाकपाच्या पाठपुराव्याला यश; जाफराबादची घंटागाडी अखेर सुरू

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ: उज्वल देवनाथ

सिरोंचा – ( इंडिया 24 न्युज ) : जाफराबाद ग्रामपंचायतीची घंटागाडी गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याने गावातील कचरा संकलन व्यवस्था विस्कळीत झाली होती. याबाबत भाकपा सिरोंचा तालुका सचिव रवि बारसागंडी यांनी प्रशासनाकडे तक्रार करून सातत्याने पाठपुरावा केला होता.

या तक्रारीची दखल घेत पंचायत समिती सिरोंचाकडून १० ऑगस्ट २०२६ रोजी चौकशी समिती गठित करून प्रत्यक्ष चौकशीचे आदेश देण्यात आले होते.

दरम्यान, आज जाफराबाद ग्रामपंचायतीची घंटागाडी पुन्हा सुरू करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच स्वामी गोदारी उपस्थित होते. घंटागाडी सुरू झाल्याबाबतच्या व्हिडिओ न्यूजमध्ये ग्रामसेवक विलास चोपवार यांनी बोलताना भाकपाच्या पाठपुराव्यामुळे घंटागाडी सुरू करण्यात आली असल्याचे सांगितले, अशी माहिती समोर आली आहे.

घंटागाडी पुन्हा सुरू झाल्यामुळे गावातील कचरा संकलन व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होणार आहे. मात्र, घंटागाडी तीन महिने बंद का होती आणि त्यासाठी जबाबदार कोण, याबाबत प्रशासनाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी भाकपाकडून करण्यात आली आहे.

भाकपा तालुका सचिव रवि बारसागंडी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ग्रामस्थांची महत्त्वाची मागणी पूर्ण झाली असून घंटागाडी नियमित सुरू राहावी, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.