आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️महिलांना एस.टी बस प्रवासासाठी एनसीएमसी कार्डची अट शासनाने त्वरित रद्द करावी.

▪️जर्नलिस्ट माधुरी कटकोजवार यांची मागणी..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज : महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या बस मधुन प्रवास करण्याकरीता शासकीय सवलतींचा लाभ मिळविण्यासाठी महिला व ज्येष्ठ नागरिकांना शासनाने एन.सी.एम.सी कार्ड अनिवार्य केल्याने सर्वत्र मोठा गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे. आगामी गणेशोत्सव तोंडावर असताना पुरेशा पूर्वतयारी शिवाय या कार्ड बाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केल्याने सर्वसामान्य प्रवाशांना फार मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे या एनसीएमसी कार्ड ची सक्ती तात्काळ रद्द करावी, अशी मागणी निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या महिला विदर्भ कार्याध्यक्षा जर्नलिस्ट कु.माधुरी कटकोजवार (चंद्रपूर) यांनी केली आहे.
महिला या नात्याने हक्काची सवलत असलेल्या 50 टक्के रक्कम नाकारून प्रवासासाठी पुर्ण पैसे मोजावे लागणार असल्याने महिला वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण होत असल्याचे समजते. शासनाच्या या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना म्हणजेच महिलांना आर्थिक अडचणीत आणण्या-या निर्णयाला त्वरित स्थगिती देण्यात यावी अशी मागणीही कु.कटकोजवार यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.