आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

अंमली पदार्थ तस्करांवर चंद्रपूर जिल्हयात पहिल्यांदाच ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : शहरात अंमली पदार्थांचे जाळे पसरविणाऱ्या आणि शरीराविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सातत्याने सक्रिय असणाऱ्या सराईत टोळीविरुद्ध धडक पाऊल उचलत व परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाई करत चंद्रपूर पोलीस दलाच्या इतिहासात अंमली पदार्थ (Drug) विक्रेत्यांवर पहिल्यांदाच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ (मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. रामनगर पोलीस ठाण्यात दाखल अपराध क्र.९८०/२०२६ कलम ८ (क), २० (b) (ii) (b), २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या खालील टोळीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता.
वसीमखान आरिफखान उर्फ कालू वय ४० वर्ष, रा. नुरी चौक, बगड खिडकी, चंद्रपूर, नसीबखान आरिफखान उर्फ मालू, वय ३९ वर्ष, रा. नुरी चौक, बगड खिडकी, चंद्रपूर, जुबेर करिम खान; रा. बगड खिडकी, चंद्रपूर, पाहिजे असलेला आरोपी, सदर आरोपींवर अंमली पदार्थ तस्करीसह शरीराविरुद्ध मारामारीचे २१ गंभीर गुन्हे दाखल असून ते पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांची ही संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र यांच्याकडे मोक्का कारवाईचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आला. सदर प्रस्तावाला मंजुरी देत मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र यांनी सदर गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) १९९९ चे कलम ३(१) (ii), ३(२) आणि ३(४) लागू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार दिनांक ०४/०९/२०२६ रोजी वरील नमूद सर्व आरोपींविरुद्ध मोक्काची कलमे वाढवून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके व त्यांच्या डी. बी. पथकातील पोलीस अंमलदारांनी पार पाडली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.