आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️पो.स्टे. ब्रम्हपुरी हद्दीत अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..

▪️एकूण मुद्देमाल 5,60,000/- रु चा माल जप्त..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं.7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 08.09.2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, गांगलवाडी मार्गे पाथरीकडे अवैध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती.

सदर माहितीच्या आधारे पो.स्टे. ब्रम्हपुरी हद्दीतील मौजा कुडेसावली येथे सापळा रचून छापा टाकण्यात आला. आरोपी त्यांच्या ताब्यातील कार मधून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करताना मिळून आले.

याप्रकरणी पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे अप. क्र. 701/26, कलम 65(अ), 83 महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

*जप्त मुद्देमाल :*
– *1)* 1,60,000/- रु. किमतीच्या एकूण 40 पेट्या (4000 नग) 90 ml क्षमतेच्या देशी दारूच्या सीलबंद बाटल्या
– *2)* 4,00,000/- रु. किमतीची दारू वाहतुकीसाठी वापरलेली FORD FIGO कंपनीची कार क्र. MH 31 BK 9242
– *एकूण जप्त मालाची किंमत : 5,60,000/- रु.*

*आरोपी :*
1) सुनिल रमेश नरुले
2) विपुल तानाबा मेश्राम
*फरार / पाहिजे आरोपी :* 3) हरभजनसिंग सतनामसिंग
(तिन्ही रा. हळदा, तह. ब्रम्हपुरी)

*कारवाई पथक :* उपविभाग ब्रम्हपुरी पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.