आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने अट्टल दोन चोरांना ठोकल्या बेड्या..

▪️हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल जप्त..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दिनांक ०८/०९/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे चंद्रपूर शहर परिसरात कारवाई करून ०२ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल जप्त करण्यात आली. सदर मोटारसायकलबाबत पोलीस ठाणे वाडी, जिल्हा नागपूर येथे अप. क्र. ५६३/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद असल्याचे तपासात निष्पन्न झाले. उघडकीस आलेला गुन्हा पोलीस ठाणे – वाडी, जिल्हा नागपूर अपराध क्रमांक – ५६३/२०२६
कलम – ३०३(२), भारतीय न्याय संहिता. जप्त मुद्देमाल : हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल, नोंदणी क्र. MP-20-MH – 8135, अंदाजे किंमत ₹५०,०००/- ताब्यात घेण्यात आलेले आरोपी गोपाल ऊर्फ कोब्रा जीवन मालाकर, वय २७ वर्षे, रा. इंदिरानगर, चंद्रपूर, यमला तंगराज कोरवान, वय ३५ वर्षे, रा. इंदिरानगर, चंद्रपूर सदर दोन्ही आरोपी व जप्त मोटारसायकल पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाणे वाडी, जिल्हा नागपूर यांच्या ताब्यात देण्यात आले. कारवाई करणारे पथक : चंद्रपूर उपविभाग पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.