आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चंद्रपूर वन प्रबोधिनीमध्ये सार्वजनिक उपक्रम समितीची बैठक..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं.7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 09 : चंद्रपूर वन प्रबोधिनी येथे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची बैठक विधानसभा सदस्य तथा समिती प्रमुख ॲड. राहुल कुल यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर बैठकीला विधान परिषद सदस्य मिलिंद नार्वेकर, विधानसभा सदस्य रईस शेख, सुलभा खोडके, संभाजीराव कोहलीकर, मोहन मते, हेमंत ओगले हे समिती सदस्य तसेच चंद्रपूर वनप्रबोधिनीचे संचालक आर. एम. रामानुजम, अपर संचालक (प्रशिक्षण ) उमेश वर्मा, वनविकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक दिव्या भारती, प्रबोधिनीच्या अपर संचालक (मुख्यालय) मनिषा भिंगे, वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक गणेश मोटकर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते चंद्रपूर वन प्रबोधिनीतर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या, ‘दी वाईल्ड विसडम ऑफ चंद्रमा’ व ‘चंद्रमा न्युजलेटर’ या अंकांचे प्रकाशन करण्यात आले. अपर संचालक उमेश वर्मा यांनी चंद्रपूर वन प्रबोधिनीविषयीचे सादरीकरण केले. वन विकास महामंडळाच्या व चंद्रपूर वन प्रबोधिनीच्या कामांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.

समितीचे अध्यक्ष ॲड. राहुल कुल यांनी व इतर समिती सदस्यांनी वन प्रबोधिनीच्या कामाचे कौतुक केले. हवामान बदल, वाढते तापमान व इतर पर्यावरणीय समस्यांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने भविष्यात प्रबोधिनीमध्ये पर्यावरणासंबंधी विषयांवर अधिकाधिक प्रशिक्षणे आयोजित करावी लागतील, असे समितीचे अध्यक्ष ॲड. राहुल कुल यांनी सांगितले.

बैठकीनंतर समुदाय सक्षमीकरणासाठी प्रथम सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने, प्रबोधिनीतर्फे चालविण्यात येत असलेल्या प्रथम कौशल्य विकास केंद्रालाही समितीने भेट दिली. संरक्षित क्षेत्राच्या बफर क्षेत्रामधील बेरोजगार तरुणांना आदरातिथ्य, ऑटोमोटिव्ह मेकॅनिक्स व इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे व केंद्रात आजवर 840 जणांना प्रशिक्षित करण्यात आले असल्याचे सत्र संचालक संभाजी गवळी यांनी सांगितले. प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींशीही समितीने यावेळी संवाद साधला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन निवृत्त सहायक वनसंरक्षक रामदास पुजारी यांनी तर आभार उपसंचालक अश्विनी जाधव यांनी मानले. यावेळी अश्विनी सोनवणे, स्वप्निल मर्सकोले, चंद्रकांत राजपूत, तेज महाडिक, प्रबोधिनीतील उपसंचालक विश्वनाथ चव्हाण, हनुमान जाधव, निवृत सहायक वनसंरक्षक प्रमोद सुतळे, नरेंद्र चेटुले, शशिकांत गराडे, गुरुराज आदि मान्यवर उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.