ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांवर सर्व शिक्षक संघटनांची शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात सभा संपन्न..

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 30/09/2026 ला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोली तथा सर्व शिक्षक संघटनांना शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली यांचे दालनात गडचिरोली जिल्ह्यांतील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्याचे अनुषंगाने पाचारण करण्यात आलेले होते. यावेळी मान. श्री प्रेरक प्रकाश उजागरे साहेब शिक्षणाधिकारी (प्राथ. ) यांना सर्व संघटनांचे वतीने निवेदन देऊन शिक्षकांच्या प्रलंबित सेवाविषयक व आर्थिक समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या सर्व प्रलंबित समस्या टप्प्याटप्प्याने सोडवण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व संघटनांना आश्वस्त केले .मान. शिक्षणाधिकारी श्री प्रेरक उजागरे साहेब यांनी शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्व संघटनांची एकत्रित बैठक आयोजित केल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच सलग पाच वर्षे शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली येथे सहायक प्रशासन अधिकारी पदाची उत्तम पद्धतीने धुरा सांभाळणारे श्री धनंजय दुमपेटीवार साहेब यांचे गडचिरोली पंचायत समितीत स्थानांतरण झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गडचिरोली तथा सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल,श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. रघुनाथ भांडेकर सर,जिल्हा सरचिटणीस श्री अशोक राॅयसिडाम सर,जिल्हा कोषाध्यक्ष श्री राजेश चिल्लमवार सर,चामोर्शी तालुका शिक्षक संघाचे युवा आघाडी अध्यक्ष श्री जगदिश कळाम सर, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री ओमप्रकाश साखरे सर, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे श्री. चक्रपाणी कन्नाके सर, फास्ट टाईप कर्मचारी महासंघाचे जिल्हा कोषाध्यक्ष श्री मोरेश्वर भैसारे सर, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सरचिटणीस श्री डॉ.दिवाकर नारनवरे सर,श्री माणिक रामटेके सर,महासंघाचे कार्याध्यक्ष श्री दिलीप मेश्राम साहेब, कास्ट्राईब कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री गौतम लांडगे सर, सेवानिवृत्त संघटनेचे प्रमुख पदाधिकारी श्री अनिल मुलकलवार सर, श्री विजय बनसोड सर, श्री कोमेरवार सर,श्री दुष्यंत तुरे सर,शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष श्री पुंडलिक देशमुख सर,शिक्षक परिषदेचे प्रमुख राज्य पदाधिकारी श्री अविनाश तालापलीवार सर,श्री विजय साळवे सर, जिल्हा प्रमुख श्री कुणाल कोवे सर,जुनी पेन्शन हक्क संघटनेचे प्रमुख पदाधिकारी श्री बापू मुनघाटे सर,श्री गुरुदेव नवघडे सर, प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश ढोरे सर,सरचिटणीस श्री खिरेंद्र बांबोळे सर,श्री डंबाजी पेंदाम,श्री साईनाथ अलोने सर,दिव्यांग संघटनेचे प्रमुख पदाधिकारी श्री राजेन्द्र गंडाटे सर,विषय शिक्षक संघटनेचे पदाधिकारी श्री संजय लोणारे सर, श्री मंगेश गद्देवार सर,श्री राजकुमार घोडेस्वार सर, श्री देवेंद्र डोहणे सर,श्री आशिष धात्रक सर,श्री विनोद ब्रामनवाडे सर,श्री चुडामण उंदीरवाडे सर, श्री प्रभाकर गडपायले सर, श्री कृपाराम खोब्रागडे सर,श्री राकेश सोनटक्के सर,बांगला शिक्षक संघटनेचे हरेन सिकदर सर,संजित सरकार सर,संमेलन सरकार सर,गांगुली सर यांचेसह गडचिरोली जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.