आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चंद्रपूर शहरातील अष्टभुजा येथे राहते घरी सुरू असलेल्या कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई दोन पिडीत महिलांची सुटका..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : आज दि.०१/१०/२०२६ रोजी गुप्तबातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की, अष्टभुजा वॉर्ड, लव्ह इंडिया चर्चच्या मागे, चंदपूर येथे महिला ही तिचे राहते घरामध्ये महिलांकडुन वेश्याव्यवसाय करवुन घेत आहे, सदर प्राप्त माहितीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अन्वये विशेष पोलीस अधिकारी श्री. अमोल काचोरे पोलीस निरीक्षक यांचे नेतुत्वात बनावट गि-हाईक पाठवुन महिला पंच, सोशल वर्कर व अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्ष चंद्रपूर येथील स्टॉफसह रेड केली असता दलाल महिला आरोपी १) मुस्कान शफीक शेख, वय ४० वर्ष, रा. रॉयनगर, लव्ह इंडिया चर्चजवळ, अष्टभुजा वॉर्ड, चंद्रपूर, मुळ रा. उसगांव, ता. घुग्गुस, जि. चंद्रपूर २) रेशमा उर्फ तैबुल फतिमा अब्दुल रफीक शेख, वय ४५ वर्ष, रा. टॉवर टेकडी जुनोना चौक, अष्टभुजा वॉर्ड चंद्रपूर हया संगणमत करून पिडीत महिलाकडुन वेश्याव्यवसाय चालवित असल्याचे निष्पन्न झाल्याने अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अन्वये पंचनामा कार्यवाही करण्यात आली. आरोपीकडुन मोबाईल, रोख रक्क्म, कंडोम बॉक्स असा एकुण २२,२४०/- रू चा माल जप्त करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे. दोन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. आरोपीविरूध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ कलम ३,४,५,७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस स्टेशन रामनगर करीत आहे.

सदरची कार्यवाही मा.श्री. आयुष नोपानी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा.श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्री. प्रमोद चौगुले उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर, श्री. अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे नेतुत्वात संतोष निंभोरकर पोलीस उप निरीक्षक, सुनिल गौरकार पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार किशोर वैरागडे, प्रफुल्ल गारघाटे, शंशाक बदामवार, प्रदिप मडावी, रूषभ भारसिंगे महिला अंमलदार/छाया निकोडे, निराशा तितरे, विजयमाला वाघमारे, अपर्णा मानकर, उषा लेंडांगे, गिता उमरे, दिपीका सोडणार, सिमा निषाद अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष चंद्रपूर व सोशल वर्कर श्रीमती सरिता मालु, माया मेश्राम, रूपाली तोंडरे, विदया चिताडे यांनी कारवाई केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.