▪️लाडकी बहिण लाभार्थ्यांसाठी महत्वाची घोषणा ! e-KYC अनिवार्य, अंतिम तारीख जाहीर

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४न्यूज ) : मूल तालुक्यातील लाडक्या बहिणींना कळवीण्यात येते की, महिलांना आर्थिक बळ देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ संदर्भात मोठी अपडेट आली आहे. लाभार्थी महिलांनी अनिवार्य e-KYC प्रक्रिया निश्चित कालावधीत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पारदर्शकता आणि पात्र लाभार्थ्यांनाच योजना मिळावी यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मूल तालुक्यातील ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप e-KYC केले नाही,त्यांना १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. यानंतर e-KYC न केलेल्या लाडक्या बहिणींचा पुढील हप्ता थांबू शकतो, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
e-KYC का आवश्यक?
योजनेत फसवणूक टाळावी आणि योजना आधिक पारदर्शक व्हावी यासाठी e-KYC सक्तीचे करण्यात आले आहे.
कुठे आणि कशी कराल e-KYC? (सोपी प्रक्रिया)
लाडकी बहिण योजनेतील महिलांनी खालील पद्धतीने e-KYC पूर्ण करावीः
1. अधिकृत संकेतस्थळाला भेट द्याः
https://ladakibahin.maharashtra.gov.in
2. ‘e-KYC / आधार पडताळणी’ पर्याय निवडा.
3. आधार क्रमांक आणि नोंदणी क्रमांक टाका.
4. आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP भरून पडताळणी करा.
5. प्रक्रिया पूर्ण – पुष्टी संदेश मोबाईलवर मिळेल.
टीप: ज्यांना ऑनलाइन प्रक्रिया स्वतः करणे शक्य नाही त्यांनी जवळच्या महा ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ही प्रक्रिया सहज पूर्ण करू शकतात.
“ज्या लाडक्या बहिणींची e-KYC प्रक्रिया प्रलंबित आहे, त्यांनी पुढील आर्थिक लाभ अडचणीत येऊ नये म्हणून तातडीने e-KYC पूर्ण करावी.
महत्वाच्या तारखाः
– KYC सुरू: १८ सप्टेंबर २०२५
अंतिम तारीखः १८ नोव्हेंबर २०२५ कागदपत्रे पूर्ण करा, योजना थांबणार नाही; पण वेळ हातातून निसटू देऊ नका!



