आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

◼️ कच्चेपार येथे निकृष्ट दर्जाचे खुले जिम; साहित्य कोसळले, मोठा अपघात थोडक्यात टळला

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

सिंदेवाही:(इंडिया २४ न्यूज) दि.८/३/२०२६
सिंदेवाहीपासुन सुमारे ८ किमी. अंतरावर असलेल्या कच्चेपार येथील गट क्रमांक २ मधिल तलावाखाली येणाऱ्या जागेत उभारण्यात आलेले खुले जिम सध्या धोकादायक ठरत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या ठिकाणी पुर्वी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य होते मात्र घाईघाईने व केवळ बिल काढण्याचे उद्देशाने कोणतीही योग्य साफसफाई न करता येथे खुले जिम उभारण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

यासंदर्भात काही दिवसापूर्वी वृत्तपत्रात बातमी प्रकाशित झाल्यानंतर केवळ थातूरमातूर मुरूम टाकून जागेची साफसफाई करण्यात आली. मात्र या प्रकरणाची कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्याप चौकशी केलीली नाही

दरम्यान, उभारण्यात आलेले जिमचे साहित्य व्यवस्थित बसवण्यात आले नसल्याने ते हलत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दिनांक ७ मार्च २०२६ रोजी एका जिमचे साहित्य अचानक कोलमडून पडण्याची घटना घडली. सुदैवाने त्या वेळी जवळ खेळत असलेला एक मुलगा थोडक्यात बचावला. अन्यथा मोठा अपघात घडू शकला असता.

घटनेनंतर पाहणी केली असता कोलमडलेले साहित्य अवघ्या पाऊण फूट खोलीत उभे करण्यात आल्याचे उघडकीस आले. यामुळे इतर सर्व जिम साहित्यही हलत असल्याने वयस्कर नागरिकांना व्यायाम करणे अवघड झाले आहे.

सकाळी व सायंकाळी या परिसरात मोठ्या प्रमाणात लहान मुले खेळत असतात. त्यामुळे एखादे साहित्य अंगावर पडून त्यांची जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तात्काळ या जिमवर व्यायाम करण्यास मनाई करावी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधित दोषीवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी गावातील नागरिकाकडून जोर धरत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.