▪️जि.प. सवादे शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक
पालघर – ( इंडिया 24 न्युज ) : कपिल पाटील चॅरिटेबल ट्रस्ट पालघर , विश्रामपूर यांच्या कडून गेल्या पाच वर्षांपासून पालघर जिल्ह्यातील, जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांमध्ये शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व भविष्यात गुणवंत नागरिक होण्यासाठी 4 जुलै 2025 रोजी विक्रमगड तालुक्यातील सवादे जिल्हा परिषद शाळेमध्ये कपिल पाटील चॅरिटेबल ट्रस्ट पालघर, विश्रामपूर यांच्या कडून ई लर्निंग शिक्षणाकरिता एक एलईडी टीव्ही भेट देण्यात आली.
यामुळे शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याचा उपयोग होऊन विद्यार्थीच्या गुणवत्ता वाढी करिता नक्कीच फायदा होईल यात तिळमात्र शंका नाही.
प्रत्येक वर्षी शाळांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणाऱ्या , सामाजिक बांधिलकी जपणारी “संकल्पना” मनात राबवुन कपिल पाटील चॅरिटेबल ट्रस्ट सामाजिक बांधिलकी जपत, शिक्षणासाठी अनमोल मदत करीत आहे. हे खूप महत्त्वाचे कार्य आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षक यांच्याकडून कपिल पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व पदाधिकारी यांचे विशेष आभार मानण्यात आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व शाळेतील शिक्षक वर्ग व कपिल पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम मोठया दिमाखात पार पडला .
सदर प्रसंगी , कपिल पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी कविवर्य तुषार ठाकरे, छाया पाटील, परेश पाटील, मनोहर पाटील व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.