▪️शिवसेना (उ. बा. ठा. ) मूल व मैत्री ग्रुप तर्फे बुजविण्यात आला बसस्थानक गेट मोठा खड्डा..
▪️बस आगार प्रमुख, कर्मचारी व प्रवाशांनी मानले आभार..

साईनाथ लोणबले
मूल तालुका उप प्रतिनिधी
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : मूल तालुका स्थळी नव्याने बनविण्यात येत असलेल्या बसस्थानक गेटवर निकृष्ट कामामुळे भलामोठा खडा पडलेला आहे. या खड्या ने बस चालक, प्रवासी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सदर ठिकाणी अपघात होऊन जीव जाण्याचे धोका आहे. या ठिकाणी अनेक किरकोळ अपघात सुद्धा झाले आहेत. याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी शिवसेना ( उ. बा.ठा. ) चे माजी तालुका प्रमुख श्री प्रशांत गट्टूवार, जागृत ग्राहक राजा चे सदस्य व मैत्री ग्रुपचे अध्यक्ष डॉ. आनंदराव कुळे यांनी कार्यकर्त्यांसमवेत केली. मात्र नगर परिषद, बांधकाम विभाग आणि एस. टी. महामंडळ यांनी निधीची अडचण दाखवून हात झटकले. कोणत्याही विभागाने दखल घेतली नाही. त्यामुळे शिवसेना मूल( उ.बा. ठा.)च्या कार्यकर्त्यांनी एक पाऊल समाजसेवेसाठी म्हणत दि. १३ ऑक्टो. २०२५ ला रात्रो वर्दळ कमी झाल्यानंतर खडया मध्ये काँक्रिटीकरण करून भल्ला मोठा खड्डा बुजविला आणि पुढील होणारे अपघात टाळले.
शिवसेना जिल्हा प्रमुख मान.संदीप भाऊ गिऱ्हे यांचे मार्गदर्शनात शिवसेना (उ.बा.ठा.) चे मूल तालुका प्रमुख राज ठाकरे, माजी तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार,मैत्री ग्रुपचे अध्यक्ष व जागृत ग्राहक राजा चे सदस्य डॉ. आनंदराव कुळे, शिवसेना (उ.बा.ठा.) चे मूल शहर प्रमुख बादल करपे,महेश चौधरी, सुनील काळे, ओमदेव मोहुरले, अमित आयलानी, राहुल बारसागडे,प्रसिद्धी प्रमुख शिवम चल्लावार,दत्तू भाऊ चिटलोजवार, मैत्री ग्रुप व माहिती अधिकार चे शहर प्रमुख संजय चिटमलवार तसेच इतर आजी, माजी पदाधिकारी यांच्या सहकार्यातून खड्डा बुजविण्यात आला. बसस्थानक मूल चे आगार प्रमुख, कर्मचारी (चालक वाहक) व प्रवाशांनी कार्याबद्दल आभार मानले आहे.



