आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️ग्राम पंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने वनराई बंधाऱ्याची निर्मिती..

▪️पंचायत समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही लाभले सहकार्य..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत अधिकारी संघटना, पंचायत समिती चामोर्शी व ग्रामपंचायत गौरीपूर येथील सरपंच सदस्य यांच्या श्रमदानातून गटविकास अधिकारी माधुरी येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील आमगाव जवळील नाल्यावर श्रमदानातून ८०० पिशव्यांचा मोठा वनराई बंधारा बांधण्यात आला तसेच दत्त मंदिर परिसरात स्वछता मोहीम राबविण्यात आली ग्रामपंचायत गिरिपुराचे सरपंच हृद्य बाला यांच्या हस्ते श्रीफळ फोडून श्रमदानाची सुरुवात करण्यात आली. श्रमदान मोहिमेत एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोद हटकर , विस्तार अधिकारी पी.पी.निंदेकर , प्रभाकर श्रीरामे ,नितीन पेंदोर , शाखा अभियंता सुजिता वाघमारे सिंचाई विभाग अभियंता अजय जाधव , सहाय्यक कार्यक्रम अधिकारी हिवराज मेश्राम , स्थापत्त्य अभियान्त्रिक सहाय्यक करण सडमेक , भाविका मडावी, पेसा समन्वयक कल्पना म्हशाखेत्री, तालुका समन्वयक मोरेश्वर गव्हारे , संदीप मोटघरे , ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष मधुकर कुकडे , उपाध्यक्ष धर्मेद फरदे , कोषाध्यक्ष कल्पेश हरडे , महिला उपाध्यक्ष लत्ता लटटे ,सह सचिव नीलकंठ धानोरकर, कायदेशीर सल्लागार गीता परचाके , चुडाराम सातपुते , संघटक प्रकाश बंडावार, प्रभा सिडाम , मनोज निमगडे, ग्रामपंचायत अधिकारी रुपेश धुर्वे ,लीलाधर मिसार ,आर आर दुमाने ,शरद येलेटटीवार, श्रीहरी आलाम,यगोपाल बरडे , सुरेश पुंगाटी,प्रशांत रामटेके , मनोज टिकेदार,अश्विन सहारे , विश्वजीत मित् ,महादेव कुंभरे , ताराकांत कापगाते , रोशन रामटेके,हरीश नैताम ,मयूर तुमराम ,राहुल इनकने , ग्रामपंचायत सदस्य तरुण गाईन , भाऊराव देवतळे आदी उपस्थित होते.श्रमदान यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत गौरीपूरचे कर्मचारी अशोक मंडल,असीम अधिकारी,माखन हलदर,ग्रामरोजगार सेवक दिलीप बिश्वास,संगणक परिचालक संतोष बुरांडे, ग्रामपंचायत लिपिक मिनती शील,साईनाथ कोडापे यांनी अथक परिश्रम घेतले . ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे सचिव मंगेशकुमार वाळके यांनी उपस्थितांचे आभार मानले. श्रमदान व स्वच्छता मोहीम कार्यक्रम संपूर्ण तालुक्यात राबविण्याचे निर्देश गटविकास अधिकारी माधुरी येरमे यांनी दिले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.