आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️पोलीस असल्याची खोटी बतावणी करुन खंडणी वसुल करणारी तोतया टोळी जेरबंद 3 खंडणीबाज अटक..

◾एकुण 13,10,000 /- रु. चा माल जप्त पोलीस स्टेशन मुल ची मोठी कारवाई.

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : भरारी पथक पोलीस असल्याची खोटी बतावणी करुन खंडणी वसुल करणारी तोतया टोळी जेरबंद करण्यात यश मुल पोलीस स्टेशन त्याचेविरुध्द कारवाई केली. यातील आरोपी हल्ली मुक्काम भिवापूर वार्ड माता नगर चौक कोयत्याने राहत असून चंद्रपूर हे आरोपी गलत पत्ता देऊन आयडी कार्ड तयार केले आहे. आरोपी क्र.1) बादल दुर्गाप्रसाद दुबे वय 36 वर्ष, 2) सौ. संगिता बादल दुबे वय 27 वर्ष दोन्ही रा. रेंगेपार ता. साकोली जि. भंडारा हे दोन्ही आरोपी चंद्रपूर येथे राहत आहेत. 3) अजय विजय उईके वय 31 वर्ष रा. गजानन मंदीर रोड शितला माता मंदीरच्या मागे चंद्रपूर 4) देवेंद्र चरणदास सोनवणे वय 30 वर्ष रा. निलज ता. साकोली जि. भंडारा, ह.मु. भिवापूर वार्ड चंद्रपूर येथे राहत असून यांनी संगनमत करून दिनांक 3 जूलै 2025
रोजी फिर्यादी नामे सुरेश लक्ष्मण गणमेनवार वय 36 वर्ष रा. चिरोली यांचे घरी एक पांढऱ्या रंगाची अर्टीका कार क. MH34-CJ-5824 नी जावुन त्यांना पोलीस भरारी पथक चंद्रपूर असल्याची बतावणी करुन त्यांचे घरी मिळुन आलेल्या विनापरवाना दारु वर कार्यवाही करण्याचे धाक दाखवुन त्यास 15,000/- रुपयाची मागणी करुन तडजोड अंती 10,000/- रु.ची खंडणी वसुल केले.

आणि मौजा डोंगरगांव येथील नामे एजाज शेख ईब्राहीम शेख याचे अंडा-आमलेट दुकानात जावुन दुकानात दारु पिणारे व्यक्ती मिळुन आल्याने त्याचेविरुध्द कारवाई करण्याचे धाक दाखवुन त्यास 10,000/- रु.ची खंडणीची मागणी करुन तडजोड अंती 5,000/- रु. खंडणी वसुल केले अशा फिर्यादीने दिनांक 13 जुलै 2025 रोजी दिलेल्या रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन मुल येथे अपराध क्रमांक 253/2025 कलम 308 (2), 204, 3( 5) भारतीय न्याय संहिता-2023 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
गुन्हयाचे तपासात, मुल पोलीसांनी आरोपी निष्पन्न करुन वरील नमुद आरोपी पैकी आरोपी क्रमांक 1 ते 3 यांना अटक करुन त्यांचेकडुन (1) एक पांढऱ्या रंगाची अर्टीका कार क. MH34-CJ-5824 किं. 12,50,000 /- रु. (2 ) दोन नग विवो कंपनीचे आणि एक नग ओपो कंपनीचा मोबाईल किं. 45,000 /- रु. (३) रोख 15,000 /- असा एकुण 13,10,000 /- रुपयाचा माल जप्त करण्यात आला असुन पुढील तपास मुल पोलीस करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन मुल चे ठाणेदार पो.नि. विजय राठोड यांचे नेतृत्वात सपोनि सुबोध वंजारी, पोहवा /240 जमीर खान पठाण, पोहवा/2397 भोजराज मुंडरे, नापोअं/2497 चिमाजी देवकते, पोअं/183 नरेश कोडापे, पोअं/1232 शंकर बोरसरे, पोअं/130 संदिप चुधरी सर्व पोलीस स्टेशन मुल यांनी केली आहे.

नागरिकांना आव्हान…

अशा प्रकारच्या खंडणीबाज तोतया बनावट पोलीसांच्या धमकी ला बळी पळु नका, अशा प्रकारे कोणीही खंडणीची मागणी केल्यास तात्काळ जवळील पोलीस स्टेशन ला किंवा पोलीस नियंत्रण कक्ष चंद्रपूर येथील 112 वर कॉल करुन माहिती द्या.पोलीसांना सहकार्य करा.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.