ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून थकबाकीची वसुली महावितरणचा निर्णय..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : 23/07/2025 दोन महिने ज्यांचे वीज देयक थकेल त्यांच्या सुरक्षा ठेवीतून थकबाकीची रक्कम कपात केली जाईल असा नवीन नियम महावितरणने 15 जुलैपासून लागू केला आहे. सर्व संवर्गातील ग्राहकांकडे वीज देयकाची थकबाकी प्रत्येक वर्षी वाढत आहे. यामुळे महावितरण ही वीज कंपनी आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यामुळे आता सलग दोन महिन्यांचे वीज देयक थकल्यास तिसऱ्या महिन्यात वीज ग्राहकाच्या सुरक्षा ठेवीतून थकबाकीची रक्कम कपात केली जाणार आहे. ही रक्कम एकदा कपात झाली की नंतर वीज ग्राहकाला प्रथम सुरक्षा ठेवीची रक्कम व त्यानंतर देयकातील इतर शिल्लक रक्कम भरणे बंधनकारक असेल. महावितरणकडून प्रत्येक वर्षी वाढीव वीज देयकानुसार पाठवले जात असलेल्या सुरक्षा ठेवीची रक्कम ज्या ग्राहकांनी भरली नसेल त्याला ही संपूर्ण रक्कम भरावी लागेल. त्यानंतरच संबंधित ग्राहकाचे शिल्लक देयक भरता येईल ही रक्कम न भरल्यास ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला जाईल. त्यानंतर ग्राहकाला पुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी पूर्वीची सुरक्षा ठेव, देयकाची थकबाकी भरावी लागेल. विज जोडणी शुल्क भरूनच वीज जोडणी पूर्ववत करता येऊ शकेल.
हा नियम लागू होण्यापूर्वी दोन महिन्यांचे देयक थकल्यास तिसऱ्या महिन्यात पंधरा दिवसांची नोटीस दिली जात होती. त्यानंतरही देयक न भरल्यास वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला जात होता. कायम विजपुरवठा खंडित झाल्यावर मात्र सुरक्षा ठेवीतील रक्कम थकबाकीतून वळती केली जात होती.
▪️दृष्टिक्षेपात:-
▪️15 जुलैपासून महावितरणाचा नवा नियम लागू ..
▪️दोन महिने वीज बिल न भरल्यास, तिसऱ्या महिन्यात ठेवीतून वसुली..
▪️नंतर सुरक्षा ठेव पुन्हा भरावी लागणार, अन्यथा सेवा प्रभावित होणार..
▪️महावितरणच्या कर्मचाऱ्यांची वीज खंडित करण्याची जबाबदारी होणार कमी..
▪️मोठ्या थकबाकीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न..
कंपनीच्या आर्थिक स्थेर्याला बळकटी देण्यासाठी निर्णय..

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.