ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️तुम्डी गावातील दारू वीक्रेत्यावर गुन्हा दाखल..

▪️दारूविक्रि बंद करण्याची महिलांची मागणी..

 

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : चमोर्शी तालुक्यातील तुम्डी येथील विक्रेत्यांविरोधात आष्टी पोलिस व मुत्किपथ टीमने संयुक्त मोहीम राबवित ६ विक्रेत्यांच्या घरी तपासणी केली असता एका विक्रेत्याकडे हातभट्टी मोहफुलाची दारू आढळून अली पोलिसांनी मुद्दे माल जप्त करीत विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला असुन इतर विक्रेत्यांनी तात्काळ अवैध व्यवसाय बंद करण्याचे आवाहन करण्यात आले
मुक्तीपथ अभियानांतर्गत सघन भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमादरम्यान गावतील महिलांची विशेष बैठक पार पडली या बैठकीला एकूण ४५ महिलांनी सहभाग नोंदवला बैठकीत महिलांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की मागील काही महिन्यांपासुन गावत अवैध दारूविक्री सुरू आहे त्यामुळे दारूविक्री बंद असलेल्या नरेंद्रपुर ठाकुर नगर गुंडपल्ली सुभाष ग्राम आडपल्ली माल‌‌‌ रामोनपुर या परिसरातील मध्यपी तुम्डी गावात दारू पिण्यासाठी येत आहेत याचा थेट परिणाम गावातील महिलांवर व नागरिकांवर होत असून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे गावत सहा दारू विक्रेते सक्रिय झाले असल्याचे सांगितले
दरम्यान, अवैध दारूविक्रीची समस्या लक्षात घेता,आष्टी पोलिस स्टेशन व मुक्तीपथच्या संयुक्त कार्यवाहीत एका दारू विक्रित्याच्या घरी तपासणी करण्यात आली असता पांच लिटर दारू जप्त करण्यात आली संबंधित विक्रेत्याविरुध्द आष्टी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तसेच इतरही विक्रेत्यांच्या घरी तपासणी करीत पुन्हा अवैध दारूविक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाईचा ईशारा देण्यात आला या कार्यवाहीदरम्यान आष्टी पोलिस स्टेशनचे पीएस आय पावर,इतर पोलिस कर्मचारी तसेच मुक्तीपथचे संघटक आनंद इंगळे उपस्थित होते यावेळी महिलांनी गावतील सर्व दारू विक्रेत्यांवर कठोर कार्रवाई करून तुम्डी गाव दारूविक्रीमुक्त करण्याची मागणी केली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.