▪️”मिस्टर टोकियोकर” चित्रपटाचे प्रथम प्रदर्शन..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक
नेरूळ – ( इंडिया 24 न्युज ) : मयुरेश फिल्म प्रस्तुत मिस्टर टोकियोकर ( हिंदी ) या चित्रपटाचा पहिला प्रदर्शन शो पाहण्याचा मान हा ज्येष्ठ नागरिकांना मिळाला. गुरुवार 24 /07/ 2025 रोजी या चित्रपटाचा खास पहिला शो जेष्ठ नागरिक संघ नेरूळ येथे आयोजित केला होता. संस्थेचे अध्यक्ष श्री अरविंद वाळवेकर सचिव श्री अजय माडेकर उपसचिव रजनी कालोश यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान दिले. अजय माडेकर यांनी चित्रपटाचे निर्माता व मयुरेश ट्रॅव्हलचे कार्यवाह संचालक श्री मनोहर परब यांच्या बद्दल माहिती दिली. मनोहर परब हे सातत्याने मराठी माणसांसाठी स्वस्त आणि मस्त जपान टूर आयोजित करत असतात.आत्तापर्यंत त्यांनी 24 जपान टूर नेल्या आहेत. त्यांची आगामी 25 वी टूर खास असेल. यासाठी मराठी नागरिकांनी सहभागी व्हावे असे त्यांनी आवाहन केले आहे.जपान बद्दल त्यांना विशेष प्रेम आहे. त्यामुळे भारतीय विशेषतः मराठी लोकांनी जपान पहावा या उद्देशाने त्यांनी ही स्पेशल टूर सुरू केली. जपान सर्वांना पाहता यावा म्हणून त्यांनी मिस्टर टोकियोकर या चित्रपटाची निर्मिती केली. यासाठी त्यांना अभिनेता दिग्दर्शक रत्नकांत म्हात्रे यांची मोलाची साथ लाभली. जपानवर आधारित हा मराठी मधला पहिला चित्रपट ठरला आहे. 13 मे 2022 रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला होता. आणि आज हिंदी चित्रपटाचा खास खेळ ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रदर्शित केला. त्याबद्दल मनोहर परब यांनी आपले मनोगत व्यक्त करून संस्थेचे आभार मानले. संस्थेच्या उपसचिव रजनी कालोश यांनी जपान विषयी आपला अनुभव सांगितला. या कार्यक्रमासाठी 70 जेष्ठ नागरिक उपस्थित होते. सर्वांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनेता रत्नकांत म्हात्रे यांनी ” मिस्टर टोकियोकर ” ( हिंदी ) चित्रपटाच्या प्रदर्शनाचा पहिला शो खास ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवला याबद्दल आनंद आणि आभार व्यक्त केले. या चित्रपटाला बेस्ट एक्सप्रीमेंटल फिल्म तसेच बेस्ट म्युझिक व्हिडिओ म्हणून अवॉर्ड देऊन गौरविण्यात आलेले आहे.लवकरच हा चित्रपट थिएटरला प्रदर्शित होईल.