▪️खामगाव हादरल : रोहन पैठणकर या बौद्ध तरुणावर जीवघेणा हल्ला..
▪️सम्राट अशोक सेना. (महा. रा. ) आकाश दादा शिरसाट या घटनेचा जाहीर निषेध..

मुख्य संपादक तथा संचालक श्री. तुळशीराम जांभुळकर
बुलढाणा / खामगाव – ( इंडिया 24 न्युज ) : हॉस्पिटल अकोला खामगाव जिल्हा बुलढाणा जिल्ह्यात रोहन पैठणकर या बौद्ध तरुणावर जीवघेणा हल्ला केला. त्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही लढा उभारला. या तरुणाच्या पाठीशी महाराष्ट्रातला संपूर्ण भीमसैनिक आहे. त्याला पाहण्यासाठी आम्ही रात्री २ वाजता मीना हॉस्पिटलमध्ये अकोला येथे गेलो. समाज झोपी गेला नाही. समाजाचा रक्षण करणारे आमच्यासारखे पॅंथर अजूनही जिवंत आहेत. रोहन पाटणकरची सर्व विचारपूस केली. डॉक्टरांना भेटून सांगितले की या पेशंटची काळजी घ्या विशेष लक्ष या पेशंटला तकलीफ होता कामा नाही. पीडित जखमी रोहनची परिस्थिती चिंताजनक आहे. अकोल्याच्या मेन हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आला आहे.
त्याला भेटण्यासाठी सर्व पॅंथरांनी यावे बुलढाण्याच्या पोलीस जिल्हाध्यक्ष यांना आम्ही मागणी करतो. तात्काळ सगळे आरोपी जेलमध्ये टाका अन्यथा महाराष्ट्रभर याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा मी देतो सर्व सामाजिक संघटना निळ्या झेंड्याखाली एकत्र येऊन या विरोधात लढा उभारतील हे घटना गंभीर आहे. मानवतेला काडीम फासणारी घटना आहे. जात विचारून मारहाण करणाऱ्याचा आम्ही निषेध करतो उद्या सगळे एक व्हा आपल्या भीमसैनिकाला न्याय भेटला पाहिजेत
यासाठी हा लढा तीव्र मजबूत करा. सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश दादा शिरसाट या घटनेचा जाहीर निषेध..