▪️देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह अंतर्गत आयोजित महाआरोग्य शिबिरात ५ हजार रुग्णांची तपासणी..
▪️अनेक रुग्णांवर होणार विनामूल्य शस्त्रक्रिया, मुंबईसह विदर्भातील डॉक्टरांचा सहभाग..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाच्या निमित्ताने शंकुतला लॉन येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा ५ हजार २६ नागरिकांनी लाभ घेतला. विविध तपासण्यांमध्ये काही रुग्णांमध्ये गंभीर आजारांचे निदान झाले असून त्यांच्यावर विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या तपासणीत बालकांचाही समावेश आहे.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजप प्रवक्त्या व चिखलीच्या आमदार श्वेता महाले, भाजप महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, कल्याणी किशोर जोरगेवार, अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंह, माजी उपमहापौर अनिल फुलझले, प्रकाश देवतळे, तुषार सोम, नामदेव डाहुले, संजय कंचर्लावार, दशरथसिंह ठाकूर, भारती दुधाणी, मंडळ अध्यक्ष रवि जागी, प्रदीप किरमे, स्वप्नील डुकरे, अॅड. सारिका संदुरकर, सुभाष आदमाने, विनोद खेवले, माजी नगरसेविका छबू वैरागडे, घुग्घुस शहर अध्यक्ष संजय तिवारी, मनोज पाल, माजी नगरसेवक देवानंद वाढई, प्रशांत चौधरी, वंदना तिखे, पुष्पा उराडे, वनिता डुकरे, शीतल आत्राम, वंदना हातगावकर, सविता दंढारे तसेच ज्युपिटर हॉस्पिटल मुंबईचे डॉ. रचना केशवानी, डॉ. सुषांत श्रीवास्तव, एनसीआय हॉस्पिटल कामटीचे डॉ. पवन अरगडे, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. वसंत वाघ, कस्तुरबा गांधी हॉस्पिटलचे डॉ. अजहर शेख, आयएमएचे अध्यक्ष डॉ. दिक्षीत आदी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रपूरात सुरू असलेल्या देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह अंतर्गत विविध सामाजिक, धार्मिक व आरोग्यवर्धक उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून आयोजित महाआरोग्य शिबिरात मुंबईच्या ज्युपिटर हॉस्पिटल, नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली.
या शिबिरात कर्करोग, बालरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, हृदयविकार, सामान्य आरोग्य, कान-नाक-घसा, श्वसन रोग, न्यूरोलॉजी, स्त्रीरोग, त्वचारोग आणि दंतरोग अशा विविध तपासण्या करण्यात आल्या. तपासणीदरम्यान गंभीर आजाराचे निदान झालेल्या रुग्णांवर विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
*आरोग्य शिबिरे गरजेची – हंसराज अहिर*
वाढते आजार पाहता त्यांचे वेळीच निदान होणे अत्यंत आवश्यक आहे. अशा शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या शरीरातील आजारांची माहिती मिळते. त्यामुळे अशा आरोग्य शिबिरांची आवश्यकता आहे, असे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी सांगितले. त्यांनी देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहातील विविध सेवाभावी उपक्रमांचेही कौतुक केले.
*मुख्यमंत्री यांचा संकल्प आमदार जोरगेवार यांनी साकारला – आ. श्वेता महाले*
वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनहिताचे उपक्रम राबवण्याचे आवाहन केले होते. अनेक आमदारांनी एक दिवसाचे उपक्रम राबवले, पण आमदार किशोर जोरगेवार यांनी १० दिवसांचा साप्ताह राबवीत तब्बल ३५५ हून अधिक उपक्रम राबवून हा संकल्प खऱ्या अर्थाने साकारला आहे, असे आमदार श्रेता महाले म्हणाल्या. त्यांनी आमदार जोरगेवार यांच्या कार्याची प्रशंसा करताना त्यांचे अपक्ष असताना केलेले काम आणि आज भाजपचे आमदार असतानाही मतदारसंघासाठीची तळमळ अधिवेशनात पाहायला मिळते, असे नमूद केले.
*पर्यटन, आरोग्य आणि शिक्षण केंद्रस्थानी – आ. किशोर जोरगेवार*
मतदारसंघात काम करताना पर्यटन, आरोग्य आणि शिक्षण या तीनही क्षेत्रांना केंद्रस्थानी ठेवून आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करत आहोत. यापूर्वीही आम्ही आरोग्य शिबिरांद्वारे ४७ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. आता या महाआरोग्य शिबिरातही गंभीर रुग्णांवर उपचाराचा सर्व खर्च आम्ही उचलणार आहोत, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.
या शिबिरात डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या मदतीमुळेच हे शिबिर यशस्वी झाले आहे. अनेक रुग्णांमध्ये गंभीर आजारांचे निदान झाले असून त्यांच्या उपचाराचा खर्च मोठा आहे. मात्र, रुग्णांनी चिंता करू नये. या सर्व शस्त्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य करण्यात येणार असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.