▪️युवा संवाद व पक्षप्रवेश कार्यक्रम गडचांदूर येथे संपन्न..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक
गडचांदूर – ( इंडिया 24 न्युज ) : गडचांदूर भाजपचे युवा कार्यकर्ते श्री. वैभव पोटे यांच्या वाढदिवसानिमित्त काल त्यांनी युवा संवाद तथा भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमाचे गडचांदूरात आयोजन केले होते.
यास आवर्जून उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला.
प्रसंगीच, श्री. वैभव पोटे यांच्या नेतृत्वात शेकडो युवकांनी भाजपात पक्षप्रवेश केला. त्यांचेही मनःपूर्वक स्वागत करीत गडचांदूर शहरात भाजपच्या संघटनवाढीसाठी पुर्ण शक्तीनिशी परीश्रम घेण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला माझ्यासमवेत तालुकाध्यक्ष संजय मुसळे, तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार, शहराध्यक्ष अरुण डोहे, महेशजी शर्मा, हरीश घोरे, विजयालक्ष्मी डोहे, शितल घोटे, पुरुषोत्तम भोंगळे, हितेश चव्हाण, कोमल फरकाडे, वैभव बोनगिरवार, अरविंद कोरे, रोहन काकडे, सतीश बेतावार, रऊफभाई शेख, दिपक वरभे, विक्की उरकुडे, महेश घरोटे, नमिता विश्वास, अपर्णा उपलेंचवार, सतिश जमदाडे, जगदिश पिंपळकर, धवल घोरे, प्रमोद पायघन आदिंसह गडचांदूरकरांची मोठी उपस्थिती होती.