ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️किसान ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन..

 

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : किसान ब्रिगेडच्या वतीने शेतकरी नेते दैनिक देशोन्नतीचे चिप इन एडिटर प्रकाश पोहरे.जिल्हा आवृत्ती प्रमुख प्रा अनिल धामोडे यांच्या मार्गदर्शनात व कुनघाडा रै येथील देशोन्नती कार्यालयाचे प्रमुख पुंडलिक भांडेकर यांच्या नेतृत्वात कर्जामुक्तीचे तिसऱ्या टप्प्यातील अर्जाचे निवेदन तहसीलदार प्रशांत घोरूडे यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २४ जून रोजी सादर करण्यात आले.
निवेदन देताना चाकलपेठचे सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष नामदेव कीनेकर.फोकूर्डीचे उपसरपंच विजय झाडे.फराडाचे सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष नीलेश चुधरी.कुनघाडाचे शेतकरी वामन काटवे.दिवाकर उडाण नागेश वासेकर.फोकूर्डीचे ग्रा प सदस्य प्रकाश पाल.रवींद्र झाडे मार्कंडा देव येथील अनिल भाकरे.सगणापुर येथील शेकाप कार्यकर्ते रमेश चौखुंडे घारगावचे माजी उपसरपंच विठ्ठल भगत.चाकलपेठचे सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश रामगिरवार.सदस्य कालिदास कीनेकर.केशव रायसिडाम मुरखडा मालचे माजी उपसरपंच दिवाकर भोपये ऋषी बटे.लालाजी गेडाम.माझी सरपंच नकटू भिवनकर.संगीता कोहपरे.कालिदास पिठाले कान्होली सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सत्यवान कुथे.माजी उपसरपंच दादाजी कुथे.बालाजी कुथे.फराडा येथील सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष भाऊजी दहेलकर.मार्कंडा देव येथील सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष पत्रूजी आभारे.उपाध्यक्ष पांडुरंग सरपे.सदस्य यादव जूनघरे, पोलीस पाटील घनश्याम आभारे.गिरिधर चुधरी.रघुनाथ ठुसे.श्रावण ठुसे आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.