▪️मूल – चंद्रपूर, मूल -चामोर्शी व मूल – सिंदेवाही या मार्गावरील जागोजागी पडलेले खड्डे अपघाताचे आमंत्रण..
▪️उपविभागीय अभियंता सार्व. बांध. उपविभाग मूल यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना च्या वतीने निवेदन..

साईनाथ लोणबले
मूल तालुका उपप्रतिनिधी
मो. क्र.९६३७२९१५६६
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : मूल ते चंद्रपूर, मूल ते चामोर्शी व मूल ते सिंदेवाही या मार्गावरील डांबरीकरण उखळलेले असून जागोजागी अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या मार्गावरील पडलेल्या खड्डयामुळे अपघात होऊन अनेकांचे जीव गेलेले आहेत. अनेक जण गंभीर जखमी होऊन कायमचे अपंग झालेले आहेत. या मार्गांवरील खड्डयामुळे पुढेही असेच अपघात होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे अपघातांचें गांभीर्य लक्षात घेऊन सदर सर्व मार्गावरील पडलेले खड्डे बुजवीण्यासंदर्भातील निवेदन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्या वतीने उपविभागीय अभियंता सार्व. बांध. उपविभाग मूल यांना देण्यात आले. सदर निवेदन साखरे साहेब सहा. अभियंता यांनी स्वीकारले.
यावेळी डॉ. आनंदराव कुळे जिल्हाध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना, श्री. संजय चिटमलवार मूल तालुका सचिव,श्री सुनील काळे माजी शिवसेना तालुका प्रमुख, विक्रम मोहुर्ले कार्यकर्ता भूमिपुत्र ब्रिगेड,संतोष चिताडे कार्यकर्ता भूमिपुत्र ब्रिगेड इ.विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.



