▪️शिवसेना व भा.ज.यु.मो.च्या वतीने नगर परिषद भद्रावती यांना निवेदन द्वारे मागणी..
▪️संताजी नगर पोटदुखे ले-आऊट येथील कब्रस्तानाच्या जागेच्या बदलाची नागरिकांची मागणी..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
भद्रावती – ( इंडिया 24 न्युज ) : संताजी नगर पोटदुखे ले-आऊट येथे वर्ष 2022 मध्ये कब्रस्तानासाठी नगर परिषद भद्रावतीकडे जागेची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार वर्ष 2023 मध्ये नगर परिषद भद्रावतीने सदर जागा कब्रस्तानासाठी निश्चित केली. त्या वेळी त्या परिसरात कोणतीही वस्ती नव्हती.
मात्र सध्या या ठिकाणी घरे उभारली गेली असून लोकवस्ती आणि नागरिकांची ये-जा वाढली आहे. त्यामुळे त्या जागेवर कब्रस्तान असल्यास स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. विशेषतः महिलावर्ग, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांमध्ये अस्वस्थतेची भावना आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख नितीन भाऊ मत्ते व युवासेना जिल्हाप्रमुख आलेख भाऊ रट्टे यांच्या मार्गदर्शनात व शिवसैनिक सुरज भाऊ शहा यांच्या नेतृत्वात व भारतीय जनता युवा मोर्चा (भा.ज.यु.मो) यांच्या वतीने नगर परिषद भद्रावतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात स्पष्ट मागणी करण्यात आली की, सदर ठिकाण सद्य:स्थितीत कब्रस्तानासाठी अयोग्य असून दुसऱ्या मोकळ्या, सुरक्षित जागेचा पर्याय तात्काळ उपलब्ध करून द्यावा.
या मागणीमागे कोणत्याही समाजाविरोधात भावना नसून, मुस्लिम समाजाच्या धार्मिक गरजांचा आदर राखून त्यांना न्याय मिळावा, तसेच स्थानिक रहिवाशांमध्ये शांतता व सलोखा अबाधित राहावा, हाच उद्देश आहे. प्रशासनाने सदर विषयाची गांभीर्याने दखल घ्यावी व त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी शिवसैनिक सुरज भाऊ शाहा, युवा शिवसैनिक सुमित हस्तक, भा.ज.यु.मो शहर महामंत्री योगेश खोब्रागडे, उपतालुकाप्रमुख सिंगलदीप पेंदाम, उपतालुका प्रमुख सुंदरसिंह बावरे, उपशहर प्रमुख मनीष बुच्चे, युवासैनिक राज चव्हाण, शिवसैनिक संदीप चटपकर, सतीश आष्टणकर, मनोज आष्टणकर, यश निमसरकर, दीप गारघाटे उपस्थित होते.