▪️महसूल सप्ताह 2025; शिरपूर तालुक्यातील अजंदे खुर्द येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक
धुळे, दिनांक 4 ऑगस्ट, 2025 (जिमाका वृत्तसेवा) :* महसूल सप्ताह 2025 च्या निमित्ताने शिरपूर तालुक्यातील करव मंडळातील मौजे अजंदे खुर्द येथे शिवरस्त्याचे दुतर्फा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिरपूर प्रांताधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार शिरपूर महेंद्र माळी, पंचायत समितीचे माजी सदस्य यतीश सोनवणे यांच्या हस्ते शिवरस्त्याचे दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले.
महसूल दिनाचे औचित्य साधून महाराजस्व अभियानातंर्गत मौजे अजंदे शिवारातील सुमारे एक किलोमीटर शिवरस्ता मोकळा करण्यात आला. यामुळे गावातील शेतकऱ्यांना शेतमाल वाहून नेण्यासाठी मदत होणार आहे.
यावेळी नायब तहसीलदार महेश साळुंखे, लोकनियुक्त सरपंच राजेंद्र पाटील, राजधर कौतिक माळी, मंडळ अधिकारी (करवंद भाग) श्रीमती योगिता पेंढारकर, मंडळ भागातील सर्व तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल व गांवकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.