आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेशाचा सपाटा..

▪️धोंडाअर्जुनीच्या काँग्रेस, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते भाजपात..

 

*🔸श्री. कुणाल गरगेलवार*
*🔸चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी*
*🔸मो नं. 9356776439*

जिवती – ( इंडिया 24 न्युज ) : दि. ०४ तालुक्यातील बहुप्रलंबीत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आमदार देवराव भोंगळे शासनदरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत आहेत. मागच्या अधिवेशांमध्येही त्यांनी जिवती तालुक्यातील विविध समस्यांना वाचा फोडली. चौदा गावांचा प्रश्न व वनजमीनच्या पट्ट्यांच्या जटील व जिवतीसाठी गेमचेंजर ठरणाऱ्या विषयालाही आमदार देवराव भोंगळे यांनी शासनस्तरावर रेटून धरून मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधले. त्यांच्या याच विकासाभिमुख नेतृत्वावर प्रभावित होऊन राजुरा विधानसभा मतदारसंघात दररोज भाजपमध्ये इनकमिंग जोरात आहे. काल दि. (०४) धोंडाअर्जुनी येथील कॉंग्रेस व शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला.

या पक्षप्रवेशामुळे गावातील राजकीय समीकरणे बदलली असून भाजपाचे संघटन अधिक बळकट झाले आहे.
याचवेळी आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते गावातील महत्वाच्या रस्त्याचे भूमिपूजन ही पार पडल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसले.

या कार्यक्रमात बोलताना आमदार देवराव भोंगळे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत जिवती तालुक्याने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवून आपली भक्कम साथ दिली; मला आमदार केलं. यामधे धोंडाअर्जुनी वासीयांचेही योगदान आहे. धोंडाअर्जुनीत मला मताधिक्य होतं. त्यामुळे तुमचे ऋण मी विसरणार नाही. त्यासाठी तुमच्या सेवेसाठी मी कायम तत्पर असेन असा शब्द देतो.
पुढे बोलताना, आगामी काळात गावाच्या विकासासोबतच नागरी समस्यांच्या सोडवणुकीसाठी विकासनिधी व सेवारुपी सहकार्य करण्यात कोणतीही कसर केली जाणार नाही. भाजप हा फक्त राजकीय पक्ष न राहता एक विकासाची चळवळ बनला आहे. नव्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणांनुसार काम करून गावाच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावावी. असेही ते म्हणाले.

यावेळी मंचावर भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, राजेश राठोड, गोविंद टोकरे, अशपाक शेख, नामदेव चव्हाण, उपसरपंच बामशुद्दीन शेख, अविनाश जुमनाके, कपिल राठोड, मुरीद शेख संजय चव्हाण, कारभारी शंकर राठोड, चंद्रकांत धोडके, दिगांबर आंबटवाड, संतोष एकलरे, वजीर शेख, मुन्ना शेख आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.