▪️मूल – चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा; अपघातांचा धोका वाढला..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : राष्ट्रीयमहामार्ग मूल ते चंद्रपूर दरम्यानच्या रस्त्याची स्थिती अत्यंत गंभीर झाली असून, ठिकठिकाणी खोल खड्डे पडल्यामुळे प्रवाशांचे आणि वाहनचालकांचे हाल होत आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक वाहने नादुरुस्त होत असून अपघाताची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे.
महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी आणि वाहनचालकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या मार्गावरील खड्डे त्वरित भरावेत, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला जाईल, अशी भूमिका घेतली आहे. विशेषतः पावसाळ्यात पाण्याने खड्डे भरून असल्यामुळे रस्ता दिसत नसल्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढल्याचेही नागरिकांनी नमूद केले.
प्रशासन आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मूल – चंद्रपूर मार्ग अपघाताचा सापळा बनत आहे.तीन दिवसापूर्वीच बडोले नामक मेक्यानिकलचा खड्ड्यात गाडी स्लिप होऊन जानाळा बस स्टॅन्ड जवळ मृत्यू झाला. यापूर्वी आगडी च्या समोर वळनावर कोठारे नामक ताईचा मृत्यू झाला होता. असे अनेक अपघात या रस्त्यावर होऊन काहींचा मृत्यू झाला तर काहींचे हातपाय मोडले.
या मूल -चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी प्रवाश्यांची आणि वाहनचालकांची रास्त मागणी आहे. शासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यावर काय कार्रवाही करेल हे पाहणे औचित्याचे ठरेल.