▪️वाघोली रेती डेपो मधून रेती चोरणाऱ्या तीन ट्रँक्टर व एक स्कॉर्पिओ गाडी जप्त..
▪️चामोर्शी चे उपविभागीय अधिकारी अरुण एम यांची धडाकेबाज कार्यवाही..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यातील वाघोली येथील शासकीय रेती डेपोत रेती वाहतुकीसाठी ट्रँक्टर लावणारे लखमापुर बोरी येथील ट्रॅक्टर गाडी मालक संजय दुधबळे यांची कळमगाव या गावात यांच्या मालकीची गाडी नंबर 1) एम एच-33 सी-6232, 2) एमएच-33 एडी-0509, 3) एम एच-33 व्हि-6685 नंबर असलेल्या ट्रँक्टर व एमएच-33 एडी-4691 स्कॉर्पिओ गाडी शनीवार दि.13/12/2025 ला सायकांळी 7:00 वाजताच्या सुमारास अवैध रेतीची वाहतुक व स्कॉर्पिओ गाडीने तस्करी साठी देखरेख करण्याच्या गुन्ह्यात
जप्त केली.
आमचे पोर्टल न्यूज प्रतिनिधी संबंधित अधिकाऱ्यांना सदर रेती तस्करी करताना ट्रॅक्टर गाड्या जप्त केलेल्या घटनेची माहिती विचारली असता जप्त केलेल्या गाड्यांचा पंचनामा व प्रतीक्रीया देण्यास उपविभागीय अधिकारी हे तहसीदार घोरुडे यांना विचारायला सांगितले व त्यांनी नायब तहसीलदार कावळे यांचे नाव सुचवले व कावळे यांनी वरीष्ठ अधिकारी यांचेकडे जाण्यास सांगीतले वरीष्ठ बाबु निमेश तोडसाम यांनी चार दिवसानंतर माहीती देऊ असे उत्तर दिल्याने लोकशाही चा चौथा आधारस्तंभ असणा-या पञकारांच्या मनात संभ्रम निर्माण होत असुन अधिकारीच माहीती पुरवीत नसेल तर पञकारांनी करायच तरी काय.

