▪️चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती, बल्लारपूर, ब्रम्हपुरी तीनही तालुके दुष्काळ घोषित करण्यासाठी मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांना दिले निवेदन..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं.7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : देशाचे नेते. आदरणीय.
पवार साहेब यांची सिल्वर ओक मुबंई येथे भेट घेत शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके चंद्रपूर जिल्ह्यातील व शहरातील विविध महत्त्वपूर्ण प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. शेतकरी, सिंचन, कर्ज, दुष्काळ, व शिक्षणाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लागावेत, यासाठी ठोस मागण्या मांडल्या.
धानावरील खोडकिडी व करपा रोगासाठी तात्काळ पंचनामे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व मोफत औषधांची उपलब्धता, धान उत्पादकांना हेक्टरी ₹20,000 बोनस, मनरेगा अंतर्गत 2023-24 मधील मंजूर विहिरींचे प्रलंबित अनुदान, जिवती, बल्लारपूर,ब्रम्हपुरी यातीनही तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादित समावेश करावा , चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी बियाणे 100% मोफत दयावे शेतकऱ्यांना आधार मिळणार अश्या मागणीचे निवेदन दिले पवार साहेबांनी शेतकऱ्यांना लवकर दिलासा मिळणार असे आश्वास दिले.
यावेळी उपस्थित पक्षाचे माजी आमदार चरण वाघमारे प्रदेश सरचिटणीस निलेश कराडे सर प्रदेश सरचिटणीस हिराचंद बोरकुटे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यवतमाळ जिल्हाध्यक्ष वर्षां निकम उपस्थित होते देणे,



