▪️रामनगर पोलीस स्टेशनची बल्लारशाह बायपास रोडवर मोठी कारवाई..
▪️एकूण जप्त मुद्देमाल किंमत: ₹५,२०,०००/- जप जप्त..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : आज दिनांक ०२/१०/२०२६ रोजी रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत बल्लारशाह बायपास रोडवरील किशाेर इलेक्ट्रॉनिक्स समोर मिळालेल्या बातमीच्या आधारे धाड टाकून अवैध देशी दारूची वाहतूक करणारा आरोपी व वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपीचे नाव मरपल्ली गणेश गौंड व्यंकटेश गौंड (वय २५ वर्षे, रा. बालाजी वॉर्ड, बल्लारशाह, जि. चंद्रपूर)
कायदेशीर कलम ६५ (अ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम
जप्त मुद्देमाल : १. देशी दारू: रॉकेट संत्रा कंपनीची देशी दारू (५०० नग, ९० एमएल) – किंमत ₹२०,०००/-, २. वाहन: पांढऱ्या रंगाची मिट्सुबिशी पजेरो चारचाकी (क्र. AP 28 BW 0828) – किंमत ₹५,०००,०००/-
एकूण जप्त मुद्देमाल किंमत: ₹५,२०,०००/-
आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. कारवाई पथक उपविभाग चंद्रपूर पथक



