▪️नगरपरिषद महासंघाच्या कार्यकारिणीत चंद्रपूरचा दबदबा..
▪️पाच पदाधिकारी बिनविरोध निवडून येत जिल्ह्याचा गौरव..! ▪️मूल च्या नगराध्यक्ष्या सौं. एकताताई प्रशांत समर्थ यांची सदस्या म्हणून वर्णी, मुलच्या शहराच्या लौकिकात मानाचा तुरा..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : मुंबई येथे आज पार पडलेल्या ‘नगरपरिषद महासंघ’ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्याने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्याचा राज्यस्तरावर मोठा दबदबा दिसून आला असून, संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक पाच पदाधिकारी कार्यकारिणीवर बिनविरोध निवडून देणारा चंद्रपूर हा एकमेव जिल्हा ठरला आहे. राज्यातील ३६४ नगराध्यक्षांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या विजयामुळे काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक जनसेवेवर जनतेचा असलेला दृढ विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. चंद्रपूरचे नवनियुक्त पदाधिकारीया निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्याला मिळालेले यश खालीलप्रमाणे आहे: उपाध्यक्ष :- श्री. अरुणजी धोटे नगराध्यक्ष, राजुरा, कार्यकारिणी सदस्य :- श्री. निलेश ताजणे नगराध्यक्ष गडचांदूर, सदस्या :-सौ. दीप्तीताई सोनटक्के नगराध्यक्षा घुग्घुस, सौ. एकताताई समर्थ नगराध्यक्षा मूल, सौ. अर्चना आशिष ठाकरे नगराध्यक्ष वरोरा.याच वेळी बदलापूरच्या नगराध्यक्षा सौ. रुचिता घोरपडे यांची नगरपरिषद महासंघाच्या अध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. विजयाबाबत प्रतिक्रिया देताना नवनियुक्त सदस्यांनी सांगितले की, “हा विजय आमच्या जनसेवेचा आणि काँग्रेस पक्षावरील विश्वासाचा आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि राज्यातील तमाम नगरपरिषदांच्या विविध समस्या शासनादरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी सदैव कटिबद्ध आहोत. या देदीप्यमान यशाबद्दल सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे चंद्रपूर जिल्हा भरातून अभिनंदन करण्यात येत आहे.



