▪️“आगामी सन ऊत्सव दरम्यान कुख्यात दारू विक्रेता यास मा. पोलीस अधिक्षक सा. चंद्रपुर आणि उपविभागीय अधिकारी गोंडपिपरी यांचा तडीपारीचा दणका..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं.7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्ह्यातील पोलीस स्टेशन कोठारी हद्दीत होणाऱ्या मस्कऱ्या गणपती ऊत्सव तसेच दुर्गो व शारदा नवरात्री ऊत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्या करीता पोलीस स्टेशन कोठारी हद्दीत राहणारा कुख्यात दारू विक्री करणारा ज्यावर एकुण ०६ गुन्हे एकटयाने केल्याने नोंद असलेला कुख्यात दारू विक्रेता नामे मनोज देवराव चांदेकर वय ४५ वर्ष रा. परसोडी ता. गोंडपिपरी जि. चंद्रपुर यांचेवर चंद्रपुर जिल्हा पोलीस स्टेशन कोठारी मध्ये गुन्हयांची नोंद आहे. त्याचे गुन्हेगारी कृत्यामुळे गावात दहशत निर्माण झाली होती. सदर इसमावर वेळोवेळी प्रतीबंधक कार्यवाही करून सुध्दा त्याने आपले कृत्य चालुच ठेवले त्याचे गुन्हयाची नोंद ठाणेदार सपोनी दिपक कांक्रेडवार पो.स्टे. कोठारी यांनी घेवुन कलम ५६ (१), (अ) (ब) महाराष्ट्र पोलीस अधिनीयम १९५१ अन्वये गोपनीय प्रस्ताव मा. पोलीस अधिक्षक सा. यांचे मार्गदर्शनात तयार करून उपविभागीय अधिकारी सा. गोंडपिपरी यांना सदर केला. यांनी सदर गुन्हयाची दखल घेवुन त्यास एक महीन्यासाठी चंद्रपुर जिल्हयात तडीपार करण्याचे आदेश काढल्याने सदर इसमास हद्दपार करण्यात आले आहे. सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक सा. चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक सा. चंद्रपुर, उपविभागीय पोलीस अधिकारी सा. राजुरा यांचे मार्गदर्शनात ठाणेदार कोठारी सपोनी दिपक कांक्रेडवार, पो.उपनि. रविद्र इंगळे, पो.अ. हिवाराज सातपुते ब.नं. १३२५ पो.अं. गणेश देठे ब.नं. १४०६, तसेच गुन्हे शाखा चंद्रपुर येथील स. फौ. अरूण खारकर, परवरीश शेख यांनी मोलाची कामगीरी केली.



