▪️शहर पोलीस स्टेशनची मोठी कारवाई.. घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरणात दोन आरोपींना अटक..

*🔸श्री. कुणाल गरगेलवार*
*🔸चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी*
*🔸मो नं. 9356776439*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : शहरातील भिवापूर वार्डातील प्रांतीक कॉलनी येथील एका महिलेच्या घरी घरफोडी प्रकरणात चंद्रपूर शहर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत आरोपींना अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला तसेच भिवापूर वॉर्डातून चोरी गेलेली दुचाकी वाहन जप्त करीत आरोपींना अटक करण्यात आली आहे.
महिला तक्रारदार दि. ११ ऑगस्ट रोजी नातेवाईकांकडे बाहेरगावी गेली होती. परत आल्यानंतर १४ ऑगस्ट रोजी तिला घराचे कुलूप तुटलेले दिसले व घरफोडी झाल्याचे लक्षात आले. तिने त्वरित शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणात कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे व तपास कौशल्याचा वापर करून आरोपींचा शोध घेतला असता आरोपी सुमित शांताराम अम्राजवार (वय २८ वर्षे) व नवीर कदीर बेग (वय २३ वर्षे), दोन्ही रा. भंगाराम वार्ड, चंद्रपूर यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या कडून ३२.७३० ग्रॅम सोन्याचे दागिने, किंमत २,६१,७७६ रुपये असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
याशिवाय, १६ ऑगस्ट रोजी नारायण चिल्लकेवार, रा. भिवापुर वार्ड यांची एम.एच. ३४ ए.झेड. २०५३ क्रमांकाची मोटारसायकल, किंमत २०,००० रुपये चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणातही अटक आरोपींनीच चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांना त्या गुन्ह्यातही अटक करण्यात आली आहे.
शहर पोलिसांनी कमी वेळातच दोन्ही गुन्हे उघडकीस आणत आरोपींना न्यायालयात हजर केले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलटे, विलास निकोडे, हवा. सचिन बोरकर, लक्ष्मण रामटेके, म. हवा. भावना रामटेके, निकेश ढेंगे, नापोशि कपुरचंद खरवार, अंमलदार जावेद सिध्दीकी, योगेश पिदुरकर, रुपेश पराते, विक्रम मेश्राम, सारीका गौरकार, दिपिका झिंगरे आदींनी केली.