▪️अंध विद्यार्थ्यांनी आनंदवन ग्रामपंचायतला भेट देत..
▪️ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी साधला मुक्तपणे संवाद..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
वरोरा – ( इंडिया 24 न्युज ) : आनंद अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रमांतर्गत श्रद्धेय बाबा आमटे यांनी स्थापित केलेल्या आदर्श ग्रामपंचायत आनंदवनला नुकतीच भेट दिली. सध्या भारतभर सुरू असलेल्या राष्ट्रीय पंचायत अभियान, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान म्हणजेच सशक्त पंचायत राज निर्माण करणे व स्थानिक प्रशासनाची कार्यक्षमता वाढवून ग्रामीण जीवनमान उंचावण्याचा संकल्प करणे माझी वसुंधरा माझा उपक्रम ,माजी जबाबदारी हा संदेश सर्व ग्रामस्थांपर्यंत ते दिव्यांग अंध विद्यार्थ्यापर्यंत पोहचावा म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वर्ग पाचवा, सातवा व आठवीच्या अंध विद्यार्थ्यांनी आनंदवनाच्या ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. ग्रामपंचायतद्वारे दिव्यांगासाठी कुठल्या सुविधा दिल्या जातात ग्रामसभाचे महत्त्व काय? शैक्षणिक योजना कोणत्या याबद्दल तसेच व्यावसायिक अनुभव, लाइफ स्टाईल इन्व्हॉर्नमेंट ,उमेद क्षितिज नवे, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, एक कदम स्वच्छता की और व सब पढे आगे बढे याबद्दल आनंदवनच्या ग्रामपंचायत अधिकारी विद्या गिलबिले यांनी माहिती दिली. तसेच सरपंच रुपवती दरेकर, उपसरपंच शौकत अली. खान व ग्रामपंचायतीचे सदस्य व कर्मचारी यांच्याकडून माहिती जाणून घेतली .सर्वांनीच योग्य असे अंध विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ .विकासभाऊ आमटे व डॉ. भारती आमटे, कौस्तुभ आमटे ,पल्लवीताई आमटे, संस्थेचे विश्वस्त सुधाकर कडू गुरुजी ,डॉ.विजय पोळ यांच्या प्रेरणेतून विकास कामाचा आढावा मांडत अंध शाळेचे मुख्याध्यापक सेवक बांगडकर आचार्य परमानंद तीरानीक कलाशिक्षक यांच्या मार्गदर्शनात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .शाळेच्या पर्यवेक्षिका साधना माटे, वर्षा उईके विशेष शिक्षिका ,विलास कावनपुरे ,शुभांगी गेडाम, शुभांगी डफ प्रसिद्धीप्रमुख, तनुजा सव्वाशेरे, तृप्ती लोहकरे, संगीत शिक्षक शुभम कातकर व शाळेतील सामाजिक कार्यकर्त्यांसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचे नियोजन करून सर्व अंध विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी सदस्यांशी मुक्तपणे संवाद साधला.



