▪️अकोल्याहून मराठा आंदोलनाला अन्नसामग्री साहित्याचा पुरवठा..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
अकोला – ( इंडिया 24 न्युज ) : मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या ऐतिहासिक आंदोलनास अकोल्यातून हातभार लागला आहे. “निर्भय बनो जण आंदोलन”, नगरसेवक मंगेश काळे मित्र परिवार तसेच सकल मराठा समाज मलकापूर-खडकी बांधव यांच्या पुढाकारातून मोठ्या प्रमाणावर अन्नसामग्री साहित्य रवाना करण्यात आले.
सध्या संघर्षयोद्धा आदरणीय मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले असून सलग चार दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू आहे. या ठिकाणी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव शांततेने ठिय्या देऊन बसले आहेत. लोकशाही मार्गाने हक्काच्या लढ्याला सुरुवात झाली असून हे आंदोलन कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून, स्वतःच्या हक्कासाठीचे आहे, असा संदेश या चळवळीतून दिला जात आहे.
आंदोलनकर्त्यांची भोजनाची सोय सुरळीत राहावी या उद्देशाने चिवडा पाकिटे, बिसलेरी पाण्याच्या बाटल्या, तसेच इतर खाद्यसामग्री असा भरगच्च साहित्यसाठा आज मुंबईकडे रवाना करण्यात आला. या उपक्रमाचा निर्णय समाजसेवक गजानन हरणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला व त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली.२ सप्टेंबर रोजी सकाळी या साहित्याने सज्ज गाडीला भगव्या झेंड्याखाली निरोप देण्यात आला. यावेळी माजी बांधकाम सभापती रामभाऊ काळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व नगरसेवक मंगेश काळे, निर्भय बनो जण आंदोलन जिल्हाध्यक्ष प्रमोद धर्माळे, हरिभाऊ राऊत, सतीश डांगे, रोहित काळे, राजू काळे, बबन काळे, गणेश गायकवाड, राहुल शहाळे, गावंडे साहेब, मनीभाई यांच्यासह सकल मराठा समाजाचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.मुंबई गाठल्यानंतर ही संपूर्ण अन्नसामग्री आझाद मैदानावरील आंदोलनकर्त्यांमध्ये वाटप करण्यात येणार असून, अकोल्याच्या मराठा बांधवांनी समाजहितासाठी उचललेले हे पाऊल आंदोलनाला नक्कीच बळकटी देणारे ठरणार आहे.



