ताज्या घडामोडी

▪️सरळसेवेतील लिपिक टंकलेखक पदांच्या भरतीकरीता 9 जानेवारीपर्यंत मुदतवाढ..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 02 : सैनिक कल्याण विभागातील लिपिक टंकलेखक (गट-क) सरळसेवा पदभरती जाहिरात 12 ऑक्टोबर 2025 व शुध्दीपत्रक 7 डिसेंबर 2025 नुसार आपल्या विभागाच्या संकेतस्थळावर अर्जदारांना ऑनलाईन अर्ज भरतीसाठीची वेब लिंक देण्यात आली आहे. परंतु सैनिक कल्याण विभागाचे संकेतस्थळ तांत्रिक कारणाने 26 डिसेंबर 2025 पासून निष्क्रीय झाल्याने इच्छूक उमेदवार वेबलिंकपर्यंत पोहचू शकत नाहीत. तरी उमेदवारांनी अर्ज भरण्याकरीता https://cdn३.digialm.com/EForms/configuredHtml/३२७८६/९६१७३/Index.html या Web Link व QR code चा वापर करून ऑनलाईन अर्ज भरावे. 9 जानेवारी 2026 संध्याकाळी 23.59 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर वेब लिंक किंवा QR Code मध्ये काही तांत्रिक अडचण आल्यास विभागाच्या dswpune@gmail.com या ई-मेल आयडीवर तात्काळ ई-मेल करून वरील वेब लिंक मागविण्यात यावी, असे सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.