आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना डीजे व साऊंड सिस्टीम वाजवणाऱ्यांवर राजुरा पोलिसांची धडक कारवाई..

▪️एकूण मुद्देमाल ₹१२,६०,०००/- मुद्देमाल जप्त..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

राजुरा – ( इंडिया 24 न्युज ) : दिनांक १४/०९/२०२६ रोजी राजुरा येथील नवीन बस स्टॉपसमोर एका वाहनावर बेकायदेशीररीत्या डीजे सुरू असल्याची गोपनीय माहिती राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली, माहितीच्या आधारे सपोनि लक्ष्मण लोकरे व पथकाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, बोलेरो पिकअप क्र. MH-34-BZ-5017 वर डीजे वाजवण्याची तयारी सुरू असल्याचे दिसून आले.

सदर वाहनचालक व मालकाकडे डीजे/वाद्य वाजवण्याबाबतच्या अधिकृत परवान्याची विचारणा केली असता, त्यांच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मोठ्या आवाजात डीजे साऊंड सिस्टीम लावून ध्वनीप्रदूषण व शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी डीजे साहित्य आणि वाहन जप्त केले.

याप्रकरणी पोलीस ठाणे राजुरा येथे अप. क्र. ७३०/२०२६ कलम २२३ भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ सहकलम ३८, १३६ महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताब्यात घेतलेले आरोपीः रवि सतीश एकनकर वय २८ वर्षे, व्यवसाय- डीजे मालक/ऑपरेटर, रा. फुलसिंग नाईक वार्ड, बल्लारशा २. सचिन इन्चुलाल सरोज वय २२ वर्षे, व्यवसाय- चालक, रा. पंडित दीनदयाल वार्ड, बल्लारशा, जि. चंद्रपूर

जप्त केलेल्या मुद्देमालाचा तपशीलः

डायनॉटीक कंपनीचे ०२ साऊंड टॉप किंमत अंदाजे ११,००,०००/-

क्रीश कंपनीचे ०४ साऊंड बेस किंमत अंदाजे १२,००,०००/-

क्राउन कंपनीची ०१ मशीन किंमत अंदाजे १४०,००,०००/-

कॉईनर कंपनीचा ०१ मिक्सर किंमत अंदाजे १२०,०००/-

किर्लोस्कर कंपनीचा ०१ जनरेटर किंमत अंदाजे ११,००,०००/-

महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. MH-34-BZ-5017) किंमत अंदाजे १८,००,०००/-

एकूण जप्त मुद्देमाल: ₹१२,६०,०००/-

कारवाई करणारे अधिकारी व अंमलदारः सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे व सहायक पोलीस अधीक्षक श्री. कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सपोनि लक्ष्मण लोकरे, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, पोहवा अनुप डांगे, पो.अ. शफीक शेख, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी आणि राजीव दुबे यांनी केली आहे.

सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या व विनापरवाना डीजे वाजवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई करण्यात येईल.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.