आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️महसूल सेवकांना चतुर्थश्रेणी दर्जा मिळावे..

▪️संघटनेने दिले मागणीचे प्रशासनाला निवेदन..

 

डॉ.आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो क्र. ९४०३१७९७

मूल – ( इंडिया २४ न्यूज) : महसूल प्रशासना तील गावपातळीवर कोतवाल हा महत्त्वाचा दुवा असूनही आजतागायत कोतवाल पदाला शासकीय चतुर्थश्रेणी सेवकाचा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे कोतवालांवर अन्याय होत असल्याचे सांगून मूल तालुका कोतवाल संघटनेतर्फे महसूल सेवकांना चतुर्थश्रेणी दर्जा देण्याची मागणी करण्यात आली.यासंदर्भात मूल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर करून ११ सप्टेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास महसूल मंत्र्यांच्या क्षेत्रात धरणे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, महसूल प्रशासनाचे गावपातळीवरील सर्व कार्य कोतवालाच्या माध्यमातून पार पडते. नागरिकांना वारस प्रमाणपत्र, जमीन मोजणी, महसूल व जमाबंदीशी संबंधित माहिती गावस्तरावर देण्याचे महत्त्वाचे काम कोतवाल करतात. अशा जबाबदाऱ्या सांभाळूनही यांना शासकीय सेवक म्हणून मान्यता मिळत नाही. कोतवाल पदाला अद्याप पारंपरिक पदाचा दर्जा असून त्यामुळे वेतनश्रेणी, भत्ते, निवृत्तिवेतन यांसारख्या मूलभूत सोयी सुविधांपासून हे सेवक वंचित आहेत. कोतवालांना चतुर्थश्रेणी सेवकाचा दर्जा दिल्यास त्यांना न्याय मिळेल, असेही संघटनेने म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.