आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
▪️महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनीचा’: स्त्रीशक्तीचा गौरवः नवरात्रीत महिला कर्मचाऱ्यांच्या कार्याला सलाम..!

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर/गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : 01/10/2025:- महावितरणमधील महिला कर्मचाऱ्यांकरिता नवरात्रमध्ये “सन्मान सौदामिनीचा” हा कार्यक्रम औसंवि/ब/३१०४६ दि. २५/०९/२०२५ या परिपत्रकानुसार गडचिरोली मंडल कार्यालयात साजरा करण्यात आला.
आज दिनांक 30- 09 – 2025 रोजी गडचिरोली मंडळाच्या वतीने सन्मान सौदामिनीचा हा कार्यक्रम मुख्य अभियंता श्री . हरीश गजबे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला . या कार्यक्रमास श्री. प्रकाश खांडेकर अधीक्षक अभियंता गडचिरोली मंडल तसेच श्री. सानप अधीक्षक अभियंता पायाभूत आराखडा चंद्रपुर परिमंडळ व गडचिरोली येथील कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते . या कार्यक्रमात एकुण 45 कर्मचारी भगिनींचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.



