▪️चंद्रपूर होमगार्ड पथक यांचे वृक्षारोपण कार्यक्रम..!
▪️"हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र" या अभियानाअंतर्गत..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : मा. महासमादेशक, महाराष्ट्र राज्य, मुबंई यांचे आदेशाने, मा. ईश्वरजी कातकडे,( जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर), यांच्या नेतृत्वात. जिल्हा होमगार्ड कार्यालय चंद्रपूर अधिकारी वर्ग सौ. नंदा सूर्यवंशी (प्रशा. अधिकारी), श्री. आर. पि. चरडे (केंद्रनायक), श्री. नरेशजी राहुड (सा. प्र. सू.) यांचे मार्गदर्शनाखाली. दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोज रविवारला जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर तथा पथक कार्यालय चंद्रपूर परिसर येथे वृक्षारोपण तथा संवर्धनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाला चंद्रपूर पथकाचे समादेशक अधिकारी श्री. संजीव कातकर, अंश. लिपिक कमलेश खोलापुरे, महिला सैनिक विशाखा रामटेके, सीमा नगराळे, संतोषी वालदे, रजनी जिवणे तसेच कवायतीला उपस्थित पुरुष व महिला होमगार्ड उपस्थित होते..



